परतवाडा : स्थानिक घामोडिया प्लॉटमधील तीनवर्षीय बालिकेने कोरोनावर मात केली आहे. स्थानिक डॉक्टरांनी दिलेल्या औषधोपचाराला प्रतिसाद देत अवघ्या तीन दिवसांत ती यातून बरी झाली आहे.
या बालिकेचे आई-वडीलसुद्धा कोरोना संक्रमित झाले होते.
रुग्णालयातील औषधोपचारानंतर त्यांनीही कोरोनावर मात केली असून, आवश्यक ती नियमावली पाळत ते सध्या घरी होम क्वारंटाइन आहेत. यापूर्वी याच प्लॉटमधील सहा दिवसांच्या बाळाने कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान, अचलपूर तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागासह शहरी भाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दरम्यान, दोन दिवसांत येथील आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.