शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

मेळघाटात तीन वाघांचे दर्शन

By admin | Updated: May 25, 2016 00:40 IST

बुद्ध पौर्णिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना, गुुगामल व अकोट वन्यजीव विभागातील साडेचारशे पाणवठ्यांवर व्याघ्र

व्याघ्र गणना : काहींच्या नशिबी मसन्या ऊद, डुुक्कर, माकड, हरिणनरेंद्र जावरे परतवाडाबुद्ध पौर्णिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना, गुुगामल व अकोट वन्यजीव विभागातील साडेचारशे पाणवठ्यांवर व्याघ्र गणनेदरम्यान नागपूरच्या डॉक्टरांना तीन वाघांनी हरणांची शिकार करताना दर्शन दिले. जवळपास तीन तास हा खेळ चालला.कारंजा येथील एका निसर्गप्रेमींच्या अंगावर अस्वल धावून आले. काहींना राणगवा, मसन्याऊद, माकड, हरिण चौसींगा रानडुक्कर, बिबट, रानकोंबडी, मोर, घुबडाचे दर्शन झाले, यावरच समाधान मानावे लागले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या तीनही विभागांत शनिवारी रात्री दरवर्षीप्रमाणे व्याघ्र व वन्यप्राणी गणनेचे आयोजन करण्यात आले होते. मेळघाटच्या अतिदुर्गम भागातील पाणवठ्यानजिक तयार करण्यात आलेल्या मचानीवर रात्रभर जागून निसर्गप्रेमींना ही वन्यप्राणी गणना करावयाची होती. पाचशेच्या जवळपास निसर्गप्रेमींनी यात सहभाग घेतला होता. व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने मचानीपर्यंत पोहोचवून देण्यासोबत आवश्यक ती सामग्री दिमतीला वनकर्मचारी, वनमजूर पाणी व इतर साहित्य नोंदवही आणि गणना झाल्यावर सहभाग नोंदविण्याचे प्रमाणसुद्धा देण्यात आले. यंदा मेळघाटात पर्यटकांच्या येण्याच्या संख्येतही कमालीची वाढ होत आहे.वाघाच्या डरकाळीने परिसर दणाणलामेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राणी प्रगणनेत नागपूर येथील समृद्ध राज व सिद्धार्थ पांडेदेखील आले होते. त्यांना ढाकणा परिक्षेत्रातील सुकळीपुरा मचान भेटली होती. रविवारी पहाटे ४ वाजता त्यांना वाघाच्या डरकाळ्यांना सामोरे जावे लागले. नजीकच्या जंगलात शिकारीचा आवाज व डरकाळ्यांनी अक्षरश: परिसर दणाणला होता. तीन तासापर्यंत वाघाच्या शिकारीची झुंज आणि शिकार झाल्यावर त्यांच्या मांसाचे लचके तोडताना थरार अनुभव नागपूरच्या डॉक्टरांना आल्याची नोंद केल्याचे त्यांनी 'लोकमत'शी बोलतांना सांगितले.मसन्याउद, मांजर आणि माकडवन्यप्राणी गणनेत सहभागी निसर्गप्रेमींना मांजर, मसन्याउद, माकड बघण्याचा अनुभवसुद्धा अनेक वन्यप्राणी गणनेत सहभागी निसर्गप्रेमींना आला. त्यांची यामुळे निराशा झाली. राणगवा, माकड, बिबट, मोर, अस्वल, चौसींगा, चितळ, घुबड यासारखे प्राणी दिसल्याची नोंद वन्यप्रेमींनी नोंदवहीत केल्याचे वनसंरक्षक विशाल माळी यांनी सांगितले.अस्वलाचा थरारमेळघाटातील वन्यप्राणी गणनेत प्रत्येकाला वाघ दिसावा, अशी अपेक्षा असली तरी ते शक्य नाही. कारंजा येथील मुंधडा हे कोहा येथील मचानवर होते. पहाटे पाच वाजता मचानीजवळ थेट अस्वलाने थयथयाट केल्याने ते अक्षरश: घाबरून गेले. मात्र सहकारी वनमजुराने त्यांना दिलासा दिला.राज्यातील निसर्गप्रेमींची उपस्थितीव्याघ्र गणनेत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून निसर्गप्रेमींनी येथे उपस्थिती दर्शविली होती. ४४९ पाणवठ्यांवर ४७१ निसर्गप्रेमींनी हजेरी लावली. यात २० महिलांचाही सहभाग होता.