शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

राज्यात तिघाडा, वार्डात बिघाडा; इच्छुक उमेदवारांची उडाली झोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:12 IST

अमरावती महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२२ रोजी संपुष्टत येत आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाद्वारा आवश्यक तयारी सुरू आहे. आता तीन सदस्यीय ...

अमरावती महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२२ रोजी संपुष्टत येत आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाद्वारा आवश्यक तयारी सुरू आहे. आता तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार असल्याने राजकीय गोटात संमिश्र प्रतिक्रिया आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत बहुसदस्यीय पद्धतीचा भाजपला फायदा झाला होता. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी महाआघाडीने कंबर कसली आहे. मात्र, यात एकीची मोट नसल्याचे दिसून येत नाही. विरोधकांच्या दुधीचा फायदा फायदा आजवर भाजपने घेतला आहे. मात्र, यावेळी भाजपही गटातटात विखुरली असल्याने त्यांनाही सत्तेचा मार्ग सोपा नाही. सध्या राजकीय पक्षांचे तार न जुळल्याने इच्छुक उमेदवारांची झोप उडाली आहे. अपक्षांना फारसा वाव या पद्धतीच्या निवडणुकीत राहत नाही. त्यामुळे घोडेबाजाराला आपसूकच लगाम घातला जाणार आहे, हेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे.

बॉक्स

महापालिकेमधील सध्याची स्थिती

महापालिकेच्या सभागृहात ८७ सदस्य व पाच स्वीकृत सदस्य आहेत. यामध्ये भाजप व सहयोगी पक्षाचे सर्वाधिक ४९ संख्याबळ आहे. याशिवाय काँग्रेस १५, एमआयएम १०, शिवसेना ०७, बसपा ०५ व अपक्ष ०१ अशी स्थिती आहे. भाजपच्या सहयोगी पक्षात युवा स्वाभिमानचे तीन व रिपाई (आटवले गट) एक सदस्याचा समावेश आहे.

बॉक्स

आता अशी असेल पालिकेची स्थिती

भाजपचे मजबूत संघटन असले तरी अलीकडे याला गटबाजीची किनार लागलेली आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धती पोषक असल्याचे दिसून आले आहे. याला छेद देण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. नव्या व जुन्या सर्वांना सोबत घेण्याची भूमिका व माजी मंत्री सुनील देशमुख यांची घरवापसी या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरली आहे. याशिवाय लहान पक्षांना यावेळी चांगलाच घाम गाळावा लागेल.

बॉक्स

एका मतदाराला द्यावे लागणार तिघांना मत

या पद्धतीमध्ये एका मतदाराला तीन सदस्यांना मतदान करावे लागेल. महापालिकेत सध्या ८७ सदस्यसंख्या व २२ प्रभाग आहे. आता तीन सदस्यीय प्रभाग पद्धती असल्याने प्रभागांची संख्या २९ होणार आहे. प्रभागरचना सन २०११ चे जनगणनेप्रमाणे होणार आहे. यामध्ये शहराची लोकसंख्या ६,४७,०५७ आहे. त्यामुळे किमान २२ ते २४ हजार मतदारांचा प्रत्येक राहणार असल्याची स्थिती आहे.

कोट

शहराच्या विकासाला बसणार खीळ

अशा पद्धतीमध्ये प्रभाग हा विस्ताराने मोठा होणार आहे. साहजिकच लहान समस्या दुर्लक्षित होतात. उमेदवारांचा निवडणूक खर्चही वाढणार आहे.

अरविंद देशमुख, तज्ज्ञ

कोट

राजकीय पक्षांना सोयीचा वाटत असता तरी बहुसदस्यीय प्रभाग प्रशासकीयदृष्ठ्या किल्ष्ट ठरतो, सदस्य एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचेही दिसून येते.

निवृत्त अधिकारी, महापालिका

कोट

राजकीय अपेक्षांवर पाणी

कोट

काँगेस पक्षाचे शहरात मजबूत संघटन आहे. प्रत्येक प्रभागात तुल्यबळ उमेदवारही तयार आहेत. त्यामुळे आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढविणार आहोत. तसे प्रदेशाध्यक्षांचे म्हणणेदेखील आहे.

बबलू शेखावत,

शहराध्यक्ष, काँग्रेस

कोट

निवडणुकीत कोणासोबत गठबंधन करायचे याबाबत अद्याप पक्षाचे आदेश नाहीत. आम्ही सर्व प्रभागात स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केलेली आहे. आमच्याजवळ तुल्यबळ उमेदवार आहेत.

राजेश वानखडे, शिवसेना जिल्हाप्रमुख

कोट

महाविकास आघाडी होईल किंवा कसे, याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे सांगण्यात आलेले आहे. त्यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. जिल्हा बँकेनंतर याबाबतच्या हालचाली गतिमान होईल.

राजेंद्र महल्ले, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

कोट

०००००००००००

००००००००००००००००

तुचार भारतीय, गटनेता, भाजप