शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी तीन एसबीआय खातेदारांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:45 IST

स्टेट बँकेच्या तीन खात्यांमधून सोमवारी सायंकाळी तब्बल ४ लाख ११ हजार ५०० रुपयांची रोख परस्पर काढण्यात आली.

ठळक मुद्देचार लाख उडविले : सायबर सेलच्या तपासाला गती; पिन बदलवून घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्टेट बँकेच्या तीन खात्यांमधून सोमवारी सायंकाळी तब्बल ४ लाख ११ हजार ५०० रुपयांची रोख परस्पर काढण्यात आली. सायबर सेलने तपासाला गती दिली असली तरी या प्रकरणातील गुन्हेगारांचा पोलिसांना अद्याप शोध लागला नाही. दरम्यान, खातेदारांनी एटीएमचा पिन क्रमांक बदलविल्यास फसवणूक थांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अमरावती शहरातील स्टेट बँकेच्या २१ खातेदारांच्या खात्यातून २० लाखांवर रक्कम काढण्यात आली आहे. आणखी तीन खातेदारांना सोमवारी सायबर गुन्हेगारांनी गंडा घातला. बडनेरा ठाणे हद्दीतील दोन खातेदार असून, एक खातेदार गाडगेनगर हद्दीतील आहे.इस्लामी चौक येथील रहिवासी मोईनोद्दीन सिराजउद्दीन हे बडनेराच्या नवी वस्ती स्थित एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांच्या खात्यातून १ लाख ५९ हजारांची रक्कम अज्ञाताने काढल्याचे निदर्शनास आले. जहीर खान जियाउल्ला खान (२८, रा.मोमीनपुरा) हेदेखील नवी वस्ती येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये गेले होते. त्यांच्या खात्यातून १ लाख ६० हजारांची रक्कम परस्पर काढण्यात आल्याची तक्रार त्यांनी नोंदवली. हरियाणातील गुडगावहून ही रक्कम काढल्याचे विवरण बँकेकडून प्राप्त झाले आहे. तिसºया घटनेत शेगाव परिसरातील रहिवासी सारनाथ कोळसुजी दहीकर (५८) यांच्या एसबीआयच्या खात्यातून आॅनलाइन ९२ हजार ५०० रुपयांची रक्कम काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.चंद्रपूरहून परतले अमरावती पोलीसएटीएम स्किमिंग व क्लोनिंग प्रकरणात सायबर सेलचे पोलीस चंद्रपुरात चौकशीसाठी गेले होते. त्या परिसरातील घडलेल्या गुन्ह्यांची माहिती व आरोपींची छायाचित्रे पोलिसांनी घेतल्यानंतर मंगळवारी ते अमरावतीत परतले.