शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘तिघीं’चे सदस्यत्व ‘अनर्ह’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:45 IST

विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया तीन नगरसेविकांचे सदस्यत्त्व अनर्ह (रद्द) ठरविण्यात आले आहे.

ठळक मुद्देजातवैधता प्रमाणपत्राचा तिढा : नगरसचिव विभागाच्या आदेशाची महापालिकेला प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया तीन नगरसेविकांचे सदस्यत्त्व अनर्ह (रद्द) ठरविण्यात आले आहे. त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्दबातल झाल्याचा आदेश नगरविकास विभागाकडून या आठवड्यात येणे अपेक्षित आहे.नागरी स्थानिक संस्थाच्या बाबतीत संबंधित सदस्यांची निवड ‘अनर्ह’ ठरविण्याची जबाबदारी नगरविकास विभागाकडे आहे. या अनुषंगाने काँग्रेसच्या शोभा शिंदे व एमआयएमच्या रुबिना तबस्सूम आणि साहेबबी कय्युम शहाँ यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत महापालिकेतील नगरसचिव विभागाने नगरविकास विभागाला पत्र पाठविले आहे.महापालिकेत मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून निवडून आलेल्या सदस्याने ६ महिन्यांच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. ते सादर न केल्यास त्याची निवड रद्द असल्याबाबतचे आदेश नगरविकास विभागाकडून जारी करण्यात येतात. त्या पार्श्वभूमिवर महापालिका आयुक्तांनी तीनही नगरसेविकांचे सदस्यत्व रद्दचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविला आहे.फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात महापालिकेच्या ८७ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी निकाल घोषित करण्यात आला. तेथून सहा महिन्यांची मुदत २२ आॅगस्ट रोजी संपुष्टात आली.तथापि या शेवटच्या दिनांकापर्यंतही या तीन नगरसेविका जातवैधता प्रमाणपत्र महापालिका यंत्रणेकडे सादर करू शकले नाही. त्यामुळे या तीनही नगरसेविकांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे.असा आहे शासन निर्णयनागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून निवडून आलेल्या सदस्याने ६ महिन्यांच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्याची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्दबातल झाली असल्याबाबतचे औपचारिक आदेश नगरविकास विभागाकडून निर्गमित करण्यात येतील, अशा सूचना २८ मार्च २०१६ च्या शासन आदेशान्वये देण्यात आल्या आहेत.