शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तीन नगराध्यक्ष अविरोध

By admin | Updated: July 19, 2014 23:40 IST

जिल्ह्यातील सात पालिकांमध्ये येत्या २२ जुलै रोेजी नगराध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. शनिवारी नामांकन परत घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी अचलपूर, चांदूूरबाजार आणि

अमरावती : जिल्ह्यातील सात पालिकांमध्ये येत्या २२ जुलै रोेजी नगराध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. शनिवारी नामांकन परत घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी अचलपूर, चांदूूरबाजार आणि धामणगाव रेल्वे तालुुक्यांत नगराध्यक्षांची अविरोध निवड करण्यात आली. एकूणच राजकीय घडामोडी आणि ऐनवेळी विरोधकांनी घेतलेली माघार यामुळे या तीनही पालिकांमध्ये नगराध्यक्षांची अविरोध निवड झाली. २२ जुलै रोजी या नगराध्यक्षांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात येईल. शेंदुरजनाघाट, अंजनगाव सुर्जी आणि चांदूररेल्वे या ठिकाणी २२ जुलै रोजी निर्धारित कार्यक्रमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पार पडेल.. अचलपूर नगराध्यक्षपदी नंदवंशीनगराध्यक्षपदासाठी नामांकन परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांपैकी तिघांनी नामांकन परत घेतल्यामुळे अचलपूरच्या नगराध्यक्षपदी नगर सुधार आघाडीचे अपक्ष उमेदवार रंगलाल नंदवंशी यांची अविरोध निवड करण्यात आली. अचलपूर नगरपरिषदेमध्ये एकूण ३८ नगरसेवक असून नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित होते. शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत नगराध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल करायचे होते. या वेळेपर्यंत विद्यमान नगराध्यक्ष अरुण वानखडे, रंगलाल नंदवंशी, गोपाल लुल्ला व भारती तट्टे यांनी अर्ज दाखल केले. शनिवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत रंगलाल नंदवंशी वगळता तिघांनी नामांकन परत घेतले. परिणामी रंगलाल नंदवंशी यांची एकमताने अविरोध निवड करण्यात आली.अचलपूर नगरपरिषदेमध्ये नगर सुधार आघाडीचे १२, काँग्रेस ४, राकाँ २, प्रहार ८, मुस्लिम आघाडी ७, अपक्ष २ असे एकूण ३८ नगरसेवक आहेत. रंगलाल नंदवंशी हे अचलपूर नगरपरिषदेचे ११ वे नगराध्यक्ष झाले आहेत.राजकीय आखाडा जिंकलारंगलाल नंदवंशी यांचे वडील सुध्दा नगरसेवक होते. ते कुस्तीमध्ये प्राविण्यप्राप्त असून दिल्ली येथील पहेलवान हनुमान यांचे शिष्य होते. आॅलम्पिक कुस्तीमध्ये जापान व देशभरातील कुस्तीचे मैदान नगराध्यक्ष रंगलाल पहेलवान यांनी गाजवले आहे. नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राजकीय आखाडासुद्धा जिंकल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. यापूर्वी ते प्रभाग क्रमांक तीन मधून नगरसुधार आघाडीकडून निवडून आले होते.