शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाखांसाठी आईने अल्पवयीन मुलीला चढविले बोहल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 12:57 IST

Amravati News तीन लाखांसाठी आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीचे अहमदाबाद येथील तरुणाशी लग्न लावून दिले.

ठळक मुद्देअहमदाबादहून परतल्यानंतर अमरावतीत डांबले

 लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : तीन लाखांसाठी आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीचे अहमदाबाद येथील तरुणाशी लग्न लावून दिले. यानंतर तीन दिवसांनी आईने तिला अमरावतीत आणले. मात्र, ती कुठेही जाऊ नये व बिंग फुटू नये म्हणून तिला आधी आसेगाव पूर्णा व नंतर अमरावतीत एका घरात डांबण्यात आले. अपहरणाच्या तक्रारीची चौकशी करीत असताना पोलिसांनी लोकेशन ट्रेस करीत तिला ताब्यात घेतल्यानंतर हा घटनाक्रम उघड झाला. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत तिचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलीस सूत्रांनुसार, १६ वर्षीय मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार तिच्या सावत्र वडिलांनी गाडगेनगर पोलिसांकडे नोंदविली होती. तथापि, आईनेच मुलीला तुझे लग्न लावून देतो, घरदेखील देतो, असे म्हणून तिला गुजरातेतील अहमदाबाद येथे नेले. तेथे राजेश नावाच्या इसमाकडून तीन लाख रुपये घेऊन त्याच्याशी लग्न लावून देण्याचे ठरले. मात्र, यात आपण कुठेही गोवले जाऊ नये, यासाठी आईने कल्पेश नामक व्यक्तीसोबत लग्न केल्याचा बनाव केला. त्यानुसार, ती मामी बनली, तर पीडिताची ओळख भाची म्हणून करून देण्यात आली. कल्पेशला मामा बनविण्यात आले. राजेशसोबत मुलीचे लग्न लावून दिल्यानंतर तीन लाख रुपये घेण्यात आले. लग्नानंतर दोन ते तीन दिवस अहमदाबाद येथे राहिल्यानंतर मुलीची कागदपत्रे आणायची आहेत, असे म्हणत ती मुलीला अमरावतीत परत घेऊन आली.

घरात डांबले

मुलगी घराबाहेर पडू नये, याकरिता तिच्या सावत्र वडिलाने तिला आसेगाव पूर्णा येथील एका घरात डांबून ठेवले. मात्र, मुलीने सुटका करून घेतली. ती एका ऑटोरिक्षात बसून अमरावतीला येत असताना ऑटोरिक्षाचालक असलेला सावत्र पिता वाटेत दिला. मुलीला अमरावतीला आणले. तिला आई-वडिलांनी मारहाणसुद्धा केली व खोलापुरीगेट येथे पूर्वी भाड्याने राहत असलेल्या एका महिलेच्या घरी ठेवले.

गाडगेनगर पोलिसांनी गाठले

गाडगेनगर ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार असल्यामुळे पोलिसांनी लोकेशन ट्रेस करीत सोमवारी तिला खोलापुरीगेट ठाणे हद्दीतील महाजनपुरा येथून ताब्यात घेतले. तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, आईनेच पैशासाठी आपले गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे लग्न लावून दिल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रेखा लोंढे, पीएसआय राजेंद्र लेवटकर, विशाल गोरले व टीमने या घटनेचा उलगडा केला.

आपल्या आईनेच पैशांसाठी अहमदाबाद येथे लग्न लावून दिल्याचे बयाणात मुलीने सांगितले आहे. ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.

- रेखा लोंढे, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी