शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

Amravati | मासेमारीठी गेलेले ३ मच्छिमार नदीत बुडाले; दोघांचे मृतदेह गवसले, एकाचा शोध सुरू

By प्रदीप भाकरे | Updated: September 17, 2022 16:54 IST

स्थानिक शेतकरी सकाळी १० च्या सुमारास शेतावर गेला होता. त्यावेळी हा प्रकार त्याच्या लक्षात आला.

अमरावती : जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातून वाहणाऱ्या पिंगळाई नदीमध्ये  मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तीन मच्छिमारांचा बुडून मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेची माहिती समजताच जिल्ह्याचे शोध आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. तिघांपैकी दोघांचे मृतदेह गवसले असून, तिसऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळी बघ्यांची देखील माेठी गर्दी झालेली आहे. 

शनिवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना उघड झाली. तिवसा परिसरातील तीन मच्छिमार पिंगळाई नदीत मासोळ्या पकडण्यासाठी टाकलेले जाळे काढण्यासाठी गेले हाेते. त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती तिवसा पोलीस आणि महसूल प्रशासनाला देण्यात आली. घटनास्थळावरुन मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार  तीनही मच्छिमार तिवसा तालुक्यातील रहिवासी आहेत.

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वैभव फरतारे हे देखील घटनास्थळी पाेहचले. तसेच जिल्हा व शोध बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले.  नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली आहे. दोघांचे मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात आले असून, त्यांना तिवसा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर रेस्क्यू पथकाकडून तिसऱ्या मच्छिमाराचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेAmravatiअमरावती