शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हिलेज बॅरिस्टर’वर आयोगाचा तीन दिवस ‘वॉच’

By admin | Updated: October 11, 2014 22:58 IST

जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांनी आपला मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आता गठ्ठा मते असलेल्या गाव पुढाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटीला सुरूवात केली आहे़ परंतु या भेटीवर थेट निवडणूक

मोहन राऊत - अमरावतीजिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांनी आपला मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आता गठ्ठा मते असलेल्या गाव पुढाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटीला सुरूवात केली आहे़ परंतु या भेटीवर थेट निवडणूक आयोगाने आपला ‘वॉच’ ठेवला आहे़ निवडणूक अंतिम टप्प्यात असल्याने तीन दिवस-रात्रीला गावात फिरणारे ‘व्हिलेज बॅरिस्टर’ म्हणजे गाव पुढारी यांच्यावर आयोगाने लक्ष केंद्रित केले आहे़ या तीन दिवसांत गावात होणाऱ्या पार्ट्यांवर तथा रात्री पैसे वाटपावर नजर ठेवण्याची जबाबदारी गावातील तलाठी व पोलीस पाटलांवर दिली आहे़ पैसे वाटप करताना आढळल्यास थेट कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला निवडणूक आयोगाने दिले आहे़ विधानसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात रणधुमाळीला वेग आला असला तरी प्रत्येक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गाठीभेटींवर लक्ष दिले आहे़ कोणत्या गावात कोणत्या समाजाची आपल्याला किती मते मिळणार याची आकडेमोड करायला सुरूवात झाली आहे़ मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्यामुळे मते खरेदी विक्रीचा व्यवहार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात सुरू झाल्याची चर्चा आहे़ कोणती मते खरेदी करायची याचा लेखाजोखा ‘व्हिलेज बॅरिस्टर’च्या माध्यमातून उमेदवारांनी घेतला असून मनी पॉवरचा पूर्ण अधिकार या ‘व्हिलेज बॅरिस्टर’ला दिला आहे़ त्यामुळे निवडणूक आयोगाचे याबाबींकडे कटाक्षाने लक्ष आहे़ संबंधित गाव पुढारी हा रात्री कुणाकडे जातो, किती मतदारांची भेट घेतो, संबंधित गाव पुढाऱ्यांसोबत किती मतदार आहेत याची गुप्त माहिती पोलीस पाटील व तलाठ्याला ठेवावी लागणार आहे़ विशेषत: तीन दिवस रात्रीला या दोघांना गस्त घालावी लागणार आहे़ पैसे वाटताना दिसल्यास थेट पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे़