शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचे आणखी तीन पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 23:20 IST

जिल्ह्यात आणखी तीन डेंग्यूरुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या आजाराचे गेल्या तीन दिवसांत २३ रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्देस्क्रब टायफसचे तीन रुग्ण : डेंग्यूने गाठले द्विशतक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात आणखी तीन डेंग्यूरुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या आजाराचे गेल्या तीन दिवसांत २३ रुग्ण आढळून आले आहेत.स्क्रब टायफसचेसुद्धा आणखी तीन रुग्ण शुक्रवारी आढळून आले आहेत. त्या कारणाने आरोग्य प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा चव्हट्यावर आला आहे. सदर रुग्ण येथील डॉ. संदीप मलीये यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अमरावती येथील हैदरपुरा परिसरातील २० वर्षीय तरुण तसेच समर्थ कालनी २० वर्षीय तरुण व ३५ वर्षीय महिला रुग्णाचा यामध्ये समावेश असून, चार ते पाच दिवसांपूर्वी सदर रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी दाखल झाले.अमरावती ग्रामीण व शहरामध्ये डेंग्यूचे आतापर्यंत २१६ रुग्ण आढळून आले आहेत. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिकेने शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबविले. खुद्द पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शहरातील अनेक प्रभागांची पाहणी केली आणि स्वच्छतेच्या मुद्द्यावर पोलखोल केली.दोन पॉझिटिव्ह, एक संशयितडॉ. संदीप मलीये यांच्याकडे ‘स्क्रब टायफस’ या जीवघेण्या आजाराचे दोन पॉझिटिव्ह, तर एक संशयित रूग्ण आढळून आला. त्यामुळे जिल्ह्यातील स्क्रब टायफस रुग्णांची संख्या आता ६७ झाल्याची माहिती आहे. डॉ. संदीप मलीये यांच्याकडे उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये दर्यापूर तालुक्यातील जुन्या दर्यापूर परिसरातील ७० वर्षीय महिला स्क्रब टायफसचे संशयित म्हणून उपचार घेत आहेत. शेलुबाजार येथील १५ वर्षीय मुलगा व चांदूर रेल्वे तालुक्यातील ५५ वर्षीय महिला स्क्रब टायफसने ग्रस्त आहे. त्यांचे निदान करून औषधोपचार सुरू आहे.