शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तीन दुग्ध केंद्रांवर धाडी

By admin | Updated: August 4, 2016 00:02 IST

शहरात अनेक ठिकाणी भेसळयुक्त व अप्रमाणित दूधविक्री होत आहे. हा प्रश्न अनेकवेळा लोकमतने लोकदरबारात मांडला.

एफडीएची कारवाई : सहा नमुने तपासणीलाअमरावती : शहरात अनेक ठिकाणी भेसळयुक्त व अप्रमाणित दूधविक्री होत आहे. हा प्रश्न अनेकवेळा लोकमतने लोकदरबारात मांडला. कमी दर्जाच्या दूधाचे सेवन केल्याने लहान मुलांसह मोठ्यांचेही आरोग्य धोक्यात आले असून एफडीएच्या अधिकाऱ्यांनी शहरातील तीन ठिकाणी तपासणी करून दूधाचे नमुने तपासण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.ही कारवाई सोमवारी शहरातील विविध भागात करण्यात आली आहे. शहरामध्ये अनेक दूध डेअऱ्यांमध्ये भेसळयुक्त दुधाची विक्री सुरु आहे. यातून लाखोंची कमाई करण्याचा गोरखधंदा त्यांनी सुरु केला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करुन काही ठिकाणी रासायनिक प्रक्रिया करून दूध तयार केले जाते. अनेक ठिकाणच्या दुधामध्ये ‘सॉलिड नोट फॅट’चे प्रमाण निर्धारित मानकानुसार प्रमाणित नसते. वास्तविक दूधाची विक्री करणाऱ्यांनी अन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार दूधाची विक्री करायला हवी. पण, शहरात अनेक ठिकाणी भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याची माहिती आहे. ही बाब अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळली. हे भेसळयुक्त दूध मानवी शरीराला हानिकारक तर नाही ना? घातक सोड्याचे मिश्रण करून तर दुधाची विक्री होेत नाही ना, हे तपासण्यासाठी अधिकाऱ्यांनी दुधाचे नमुने घेतले. यामध्ये राजकमल चौकातील रोहित दूध डेअरीमध्ये तपासणी करण्यात आली. येथून म्हशीच्या दुधाचा नमुना, फुलक्रिम मिल्कचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.येथीलच यशोदा डेअरीतून पाकिटबंद दूध, होलसम म्हशीचे दुधाचा नमुना घेण्यात आला. जुन्या कॉटन मार्केट जवळील निळकंठ एजन्सीजमधून सुरभी ब्रांडचे टोन्ड मिल्क, क्लासिक ब्रॅण्डचे प्रमाणित दूध जप्त करून ते तपासणीसाठी येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत मंगळवारी पाठविण्यात आले. ही कारवाई एफडीएचे सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे, नीलेश ताथोड यांनी केली. दुधात शरीराला हानिकारक असलेला धुण्याचा सोडा मिसळलेला आहे काय?, हे तपासण्यासाठी नमुने जप्त करण्यात आले आहेत. दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. - मिलिंद देशपांडेसहायक आयुक्त, एफडीए अमरावती.