शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

सिलिंडरचा भडका चिमुकल्यासह तिघे भाजले

By admin | Updated: January 21, 2017 00:08 IST

सिलिंडरमधील गॅसच्या भडक्याने एका कुटुंबातील तीन जण भाजले गेले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६.१० वाजताच्या सुमारास रवीनगर गल्ली क्रमांक ३ मधील रहिवासी भूषण मनोहर भोगे यांच्या घरात घडली.

साहित्य, कार जळाली : रविनगर गल्ली क्रमांक ३ मधील घटनाअमरावती : सिलिंडरमधील गॅसच्या भडक्याने एका कुटुंबातील तीन जण भाजले गेले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६.१० वाजताच्या सुमारास रवीनगर गल्ली क्रमांक ३ मधील रहिवासी भूषण मनोहर भोगे यांच्या घरात घडली. शौनक भोगे (५), कांताबाई भोगे (७५) व भूषण यांची पत्नी अशी तिघेही या आगीत भाजली गेली. अग्निशमन दलाचे कर्मचारी वेळेवर पोहचल्याने आग नियंत्रणात येऊ शकली, त्यामुळे मोठी हानी टळली. भूषण भोगे यांच्या घरातील सिलिंडरमधील गॅस शुक्रवारी संपला होता. त्यामुळे त्यांनी नवीन सिलिंडर बोलावले होते. ते सिलिंडर लावताना अचानक भडका उडाला. जखमी अवस्थेत तिघांनाही तत्काळ कुटुंबातील अन्य सदस्यांनी खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. या घटनेची माहिती शेजारी राहणाऱ्या राजेंद्र प्रल्हाद कोल्हे यांनी अग्निशमन दलाला दिली. माहितीच्या आधारे फायरमन कल्याणकर, आडे, हजारे व वाहनचालक अहमद खाँ मिय्या खा यांनी पाण्याचा बंब घेऊन तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तासाभरानंतर आगीवर नियंत्रणअमरावती : भोगे कुटुंबातील सदस्य व काही नागरिकांनी सिलिंडरला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गॅसच्या भडक्याने त्यांच्या घरातील फर्निचरसह बहुतांश घरगुती साहित्य जळून खाक झालेत. त्यामुळे त्यांनी सिलिंडर पुढे लोटत बाहेर नेले. मात्र, आगिच्या झळा त्यांच्या कारपर्यंत पोहोचल्या आणि कारही आगीच्या विळख्यात आली. या आगित त्यांची कारसुध्दा जळुन खाक झाली. अग्निशमन दल पोहोचताच त्यांनी आगीवर पाण्याचा मारा करून त्यांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस ठाण्याचे पीएसआय पंकज ढोके यांनीही पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते.महिनाभरातील तिसरी घटनाशहरात महिनाभरात सिलिंडर भडक्याच्या तीन घटना घडल्या. यामध्ये संजीवनी कॉलनीत झालेल्या सिलिंडरच्या भडक्यात रीना ठाकरे नावाची विद्यार्थिनी दगावली, तर तिच्या मैत्रिणीवर अजूनही उपचार सुरु आहेत. दुसरी घटना काही दिवसांपूर्वीच राहुलनगरात घडली. सिलिंडर भडक्याने एका घरातील साहित्य जळून खाक झाले, तर तिसरी घटना शुक्रवारी रवीनगरात घडली. सिलिंडर भडक्याच्या या वाढत्या घटना लक्षात घेता नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.