शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

धामणगाव बाजार समितीत तीन कोटींचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 11:50 IST

शेतकऱ्यांना शेतमाल तारण कर्ज न देता स्वत: वापरणे, प्रवास भत्त्याची अधिक उचल, शेतकऱ्यांच्या भोजनालयावर अव्वाच्या सव्वा खर्च दाखविणे याप्रकारे एकूण २ कोटी ९९ लाख रुपयांचा अपहार धामणगाव रेल्वे येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत उघड झाला आहे.

ठळक मुद्देलेखापरीक्षणात ठपकासभापती, संचालकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांना शेतमाल तारण कर्ज न देता स्वत: वापरणे, प्रवास भत्त्याची अधिक उचल, शेतकऱ्यांच्या भोजनालयावर अव्वाच्या सव्वा खर्च दाखविणे याप्रकारे एकूण २ कोटी ९९ लाख रुपयांचा अपहार धामणगाव रेल्वे येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत उघड झाला आहे. याप्रकरणी जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बाजार समिती सभापती व संचालक मंडळाविरुद्ध शुक्रवारी धामणगावातील दत्तापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या फौजदारी प्रकरणाने सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.धामणगाव बाजार समितीच्या सन २०१७-१८ चे लेखापरीक्षण अहवालातून हा गैरव्यवहार तथा अफरातफर उघड झाली. जिल्हा विशेष लेखापरीक्षक अशोक माकोडे यांनी अहवालाअंती पोलीस तक्रार दाखल केली. शेतमाल तारण कर्ज शेतकºयांसाठी असताना ते संचालक मंडळ व इतर शेतकºयांच्या नावाने दाखवून २ कोटी ८२ लाख रुपयांच्या तारण कर्जाची अफरातफर केली आहे. सभापतींनी १ लाख २४ हजार रुपयांचा प्रवासभत्ता दाखवून गैरव्यवहार केल्याचा ठपका लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे. शेतकºयांसाठी असलेले भोजनालय अनधिकृतरीत्या चालवून २ लाख १५ हजार रुपयांचा खर्च दाखविण्यात आला.सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालातून २ कोटी ९९ लाख रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी सभापती, सचिव व सर्व संचालक मंडळाच्या विरोधात वरिष्ठांंच्या आदेशानुसार दत्तापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.- अशोक माकोडे, जिल्हा विशेष लेखापरीक्षकधामणगाव बाजार समितीच्या सभापती, सचिव व सर्व संचालक मंडळाविरुद्ध जिल्हा विशेष लेखापरीक्षक अशोक माकोडे यांनी तक्रार दिली आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडे विचारणा करण्यात येईल. अद्याप चौकशी सुरू असून, गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.- रवींद्र सोनवणे, पोलीस निरीक्षक, दत्तापूर

टॅग्स :fraudधोकेबाजी