शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लग्न समारंभातील मिरवणुकीतून तीन बालकामगारांची सुटका

By admin | Updated: April 19, 2017 00:09 IST

लग्न समारंभातील मिरवणुकीत लाईटिंग हाती घेणाऱ्या ३ बाल कामगारांची सुटका करण्यात आली.

लाईटिंग कंत्राटदाराविरुद्ध कारवाई : रुद्रेश मंगल कार्यालयासमोरील घटनाअमरावती : लग्न समारंभातील मिरवणुकीत लाईटिंग हाती घेणाऱ्या ३ बाल कामगारांची सुटका करण्यात आली. सरकारी कामगार अधिकारी, चाईल्ड लाईन व राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प अधिकाऱ्यांनी सोमवारी नवाथेनगरस्थित रुदे्रश मंगल कार्यालय ते रंगोली हॉटेलदरम्यान ही कारवाई केली. या कारवाईत जय बालाजी लाईटिंग अ‍ॅन्ड रथचे संचालक सुभाष साहू यांना राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तिन्ही मुलांना बाल निरीक्षण गृहात पाठविण्यात आले आहे. १४ वर्षांखालील बालकांकडून कुठल्याही श्रेत्रात काम करून घेण्यास शासनाने प्रतिबंध लावला आहे. मात्र, शहरात अजूनही अनेक व्यापारी फायद्यासाठी बाल कामगारांचा वापर करीत आहेत. सोमवारी रुद्रेश मंगल कार्यालयातील लग्न समारंभाच्या मिरवणुकीत नवरदेव रथावर बसलेले होते. त्याच्यासमोर डीजेच्या तालावर वऱ्हाड नाचत मारोतीवर जात होते. याच मिरवणुकीत तीन बालकामगाराच्या हातात लाईटिंगच्या छत्र्या आढळल्या. याची माहिती चाईल्ड लाईनला मिळताच त्यांनी सरकारी कामगार अधिकारी डी.बी.जाधव यांना कळविले. त्यानुसार जाधव यांच्यासह राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाचे संचालक प्रविण येवतीकर, प्रकल्प व्यवस्थापक पंकज देशमुख, चाईल्ड लाईनचे अजय देशमुख व राजापेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तिन्ही बालकामगारांची चौकशी केली. ते १४ वर्षांच्या आतील असल्याचे कळले तसेच ते बालकामगार साहू यांच्याकडे १०० रुपये रोजंदारीने ठेवल्याचे निदर्शनास आले. तेथून तीन्ही बालकामगारांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधिन करण्यात आल्याची माहिती डी.बी.जाधव यांनी दिली. याप्रकरणात साहू यांच्याविरुद्ध अधिनियम २०१६ ची कलम ३ चा भंग झाल्याची कारवाई करण्यात आली.२० हजारांचा दंड, दोन वर्षांची शिक्षा१४ वर्षांआतील मुलांकडून कुठल्याही क्षेत्रात काम करून घेण्यास प्रतिबंध आहे. असे आढळून आल्यास बाल कामगार अधिनियम १९८६, सुधारणा अधिनियम २०१६ ची कलम ३ चा भंग होतो. ही बाब सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीला २० हजारांचा दंड व दोन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे बालकामगार ठेवणे हे कायद्याने गुन्हा असून याकडे नागरिकांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी डी.बी.जाधव यांनी केले.