शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीस पळविणाऱ्या तिघांना गुजरातेतून अटक

By admin | Updated: February 28, 2017 00:05 IST

एका १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळविल्यानंतर तीच्यावर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात ..

फ्रेजरपुरा पोलिसांची कारवाई : अपहरण, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल अमरावती : एका १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळविल्यानंतर तीच्यावर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी तिन आरोपींना गुजरातवरून रविवारी रात्री अटक केली. सुमित रामकृष्ण बोरकर (२०), स्वाती वासुदेव शितोडे (२०) व अक्षय केशव खांडेकर (२१,सर्व राहणार वडाळी) अशी अटक आरोपींची नावे आहे. वडाळी परिसरातील एक १६ वर्षीय मुलगी २० फे्रबुवारी रोजी घरातून बाहेर गेल्यावर पुन्हा परतली नव्हती. दरम्यान त्याच परिसरातील रहिवासी सुमित बोरकर, स्वाती शितोडे व अक्षय खांडेकर हे सुध्दा घरून निघून गेले होते. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने २१ फेब्रुवारी रोजी फे्रजरपुरा पोलीस ठाणे गाठून तिघांंविरुध्द तक्रार नोंदविली होती. पोलीस कोठडीची मागणीअमरावती : याप्रकरणात पीएसआय राम गिते यांच्या पथकाने चौकशी केली असता आरोपींचे मोबाईल लोकेशन प्राप्त होऊ शकले नाही. दरम्यान एका आरोपीची मावशी ही सूरत शहरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय राम गिते व पथकातील पोलीस शिपाई नीलेश जाधव, राजू सायगन व सायबर सेलचे संग्राम यांनी थेट सूरत शहर गाठले. पोलिसांनी आरोपींच्या घराजवळ सापळा रचला. प्रथम आरोपी अक्षय हा घरातून बाहेर आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या घरातून अन्य आरोपी व त्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. आरोपी व ती अल्पवयीन मुलगी एकाच खोलीत राहिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. आरोपीसह त्या अल्पवयीन मुलीला सोमवारी अमरावतीत आणले. अपहरणाच्या गुन्ह्यात लैंगिक अत्याचार व पॉक्सो अ‍ॅक्ट वाढविला आहे. सामूहिक बलात्काचीही शक्यताआरोपी सुमित व अक्षय हे दोघेंही मित्र असून अक्षयची स्वाती ही पे्रयसी आहे. तिघांनीही १६ वर्षीय मुलीला फूस लावून गुजरातला नेले. त्या ठिकाणी एकाच खोलीत चौघेंही राहू लागले. दरम्यान त्या अल्पयवीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असावा, अशी शंका पोलिसांनी वर्तविली आहे. त्या दिशेनेही पोलीस चौकशी करीत आहे. नांदगावच्या मुलीचे अकोल्यात पलायननांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक मुलगी घरून निघून गेल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता ती मुलगी अकोल्यात असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी त्या मुलीला अकोल्यातून ताब्यात घेतले असून तिच्यासोबत एक युवक असल्याचेही आढळून आले आहे.