शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांची शिकार करणारे तीन आरोपी अद्यापही मोकाटच

By admin | Updated: June 1, 2015 00:34 IST

पश्मिच मेळघाटातील ढाकणा वनपरिक्षेत्रात झालेल्या वन्यप्राण्याच्या शिकारी प्रकरणात तीनही आरोपी अद्यापर्यंत ..

हिराबंबई येथील घटना : वनविभागाचा तपास थंडबस्त्यात अमरावती : पश्मिच मेळघाटातील ढाकणा वनपरिक्षेत्रात झालेल्या वन्यप्राण्याच्या शिकारी प्रकरणात तीनही आरोपी अद्यापर्यंत मोकाटच आहे. वनविभागाने तीनही आरोपींना नोटीसा बजावल्यापासून तपासकार्य थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. आठ महिन्यांपूर्वी ढाकणा वनपरिक्षेत्रातील हिराबंम्बई गावानजीक वाघाची शिकार करुन आरोपींनी अवशेष जमिनीत पुरविल्याची माहिती ढाकणा वनपरिक्षेत्र कार्यालयाला मिळाली होती. त्यानुषंगाने वनविभागाने १९ मे रोजी शोभाराम पुनिया धांडे, शामलाल शिकारी धांडे व सुभाष शिकारी धांडे यांच्या घरी धाड टाकून पाच ते सहा प्रजातीच्या वन्यप्राण्याची अवशेष जप्त केलीत. यातील शोभारामला वनविभागाने ताब्यात घेतले होते. तर शामलाल व सुभाष पसार झाले. वनविभागाने शोभारामचे बयाण नोंदविल्यावर त्यांने सांगितल्याप्रमाणे वनविभागाने अवशेषांची शोध मोहिम राबवीली. त्यावेळी आरोपीच्या घरामागच्या परिसरातील एका खड्डयामध्ये काही वन्यप्राण्याची अवशेष आढळून आली. वनविभागाने वन्यप्राण्याची अवशेष हैदराबाद व देहरादून येथील प्रयोगशाळेत उत्तरीय तपासणीकरिता पाठविले आहे. त्याचा अहवाल तीन ते चार महिन्यात मिळेल असे वनविभागाकडून सांगण्यात आले. १९ मे रोजी हा वन्यप्राण्याच्या शिकारीचे प्रकरण उघड झाले. मात्र, अद्याप तिन्ही आरोपींना वनविभागाने अटक का केली नसल्याचे माहिती हाती लागली आहे. निसर्ग संवर्धन व वन्यप्राण्याच्या संरक्षणासाठी जागतिक स्तरावर दखल घेतली जाते. मात्र, मेळघाटमधील वन्यप्राण्याच्या शिकारी प्रकरणाच्या तपास गाभिर्यपुर्वक होत नसल्याचे दिसून येत आहे. वनविभागाने काही नागरिकांचे बयाण नोंदविले असून तिन्ही आरोपींना नोटीस बजावली आहे. मात्र, अद्यापही आरोपींना अटक करण्यात आली नाही. हे विशेष. वन्यप्राण्याच्या शिकार प्रकरणात वाघाचे अवशेष अद्याप वनविभागाच्या हाती लागले नसल्यामुळे आरोपींना नोटीस बजावून बोलाविण्यात आल्याचे परतवाडा येथील सहायक वनसंरक्षक एस.एस.भागवत यांनी सांगितले. वाघ शिकारीचे कोणतेही पुरावे अद्याप हाती लागले नाही. त्यामुळे आरोपींना नोटीस बजावण्यात आली आहे. परिसरातील नागरिक, पोलीस पाटील व श्यामलाल धांडेचे बयाण नोंदविण्यात आले आहे.-एस.एस. भागवत, सहायक वनसंरक्षक, परतवाडा