शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

तिहेरी हत्याकांडात ३६ आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : शहरात सोमवारी घडलेल्या घटनेनंतर दाखल दोन गुन्ह्यांत एकूण ३६ आरोपींना अटक करण्यात आली. आर्म्स ...

ठळक मुद्देआर्म्स अ‍ॅक्ट, दगडफेकीचे स्वतंत्र गुन्हे दाखल : अफवा पसरविणारे ताब्यात, पाचशे पोलीस तैनात, आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरात सोमवारी घडलेल्या घटनेनंतर दाखल दोन गुन्ह्यांत एकूण ३६ आरोपींना अटक करण्यात आली. आर्म्स अ‍ॅक्ट आणि दगडफेकीचे स्वतंत्र गुन्हे काही जणांवर दाखल केले आहेत. त्यांची ७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविली असून, २५ जणांची तुरुंगात रवानगी झाली आहेत. बुधवारी दुपारी तीन तासांकरिता संचारबंदी शिथिल करण्यात आली. मात्र, गुरुवारचा आठवडी बाजार भरणार नाही, असे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढले.शहरात मंगळवारी सायंकाळी ७ वाजतापासून जिल्ह्याबाहेरही अफवांचा बाजार पसरला होता. भीतीपोटी पोलीस ठाण्यालाही अनेकांनी फोन केलेत. यातच पोलिसांनी आरोपींना पकडण्याकरिता कोम्बिंग आॅपरेशन राबविले. पोलीस सुरक्षा अधिक कडक करण्यात आली. यादरम्यान अफवा पसरविणाऱ्यांसह अन्य प्रकारात ३० ते ४० जणांना मंगळवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना परतवाडा पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. मंगळवारी रात्री राबविलेल्या कोम्बिंग आॅपरेशनदरम्यान खुद्द विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे परतवाडा पोलीस ठाण्यात बसून होते. जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी रात्रभर शहरात पोलिसांचे नेतृत्व सांभाळले. अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्याम घुगे सोबतीला होते.दरम्यान, विभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी शहराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.संचारबंदी शिथिलसंचारबंदी बुधवारी दुपारी ३.३० नंतर तीन तासांकरिता शिथिल करताच शहरातील रस्ते, दुकानांवर नागरिकांनी एकच गर्दी केली. दोन दिवसांपासून ओस पडलेल्या बाजारपेठा, रस्ते गर्दीने गजबजले. दोन दिवसांपासून तणावात असलेले पोलीसही तणावमुक्त झाल्याचे आढळले. पेट्रोल पंप, एटीएम, किराणा दुकान, पीठ गिरणी यावर रांगा लागल्याचे दिसून आले. संचारबंदीपूर्वी जो भाजीपाला बाजारात शिल्लक होता, त्यावर नागरिक तुटून पडले. दोन दिवसांत शहरात नेमके काय घडले, याची माहिती काहींनी जाणून घेतली.ठाणेदारांची बदलीपरतवाड्याचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांची बदली करण्यात आली आहे. नवे ठाणेदार म्हणून सदानंद मानकर रुजू होत आहेत. ते सध्या अकोला येथे कार्यरत आहेत. शहरात उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने त्यांना अकोल्यावरून परतवाड्यात बोलावण्यात आले.शहर शांत ठेवूया; बच्चू कडू यांचे आवाहनआपण सारे मिळून शहर शांत ठेवूया. शहरात कायदा सुव्यवस्था कायम राहील, याकरिता सर्वांनी आपापल्या परीने भूमिका वठवू या, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी जुळ्या शहरातील नागरिकांना केले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याकरिता करण्यात आलेले रॅलीचे नियोजन रद्द करुन रक्तदानाद्वारे उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय आमदार बच्चू कडू यांनी घेतला आहे.विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणीलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी बुधवारी अचलपूर येथे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी पोपट अब्दागिरे यावेळी उपस्थित होते. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अशी कुठलीही अफवा निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना ०७२२३ - २२०००२ किंवा ०७२१ - २२६५०४१ या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दागिरे यांनी केले आहे.दरम्यान, शहरात शांतता राखण्याचे आवाहन मराठी पत्रकार संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, जेसीआय, सराफा असोसिएशन, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ हेल्पलाईन, मुव्हमेंट आॅफ पीस अँड जस्टिस, संकल्प सेवा समिती, भूमी बहुउद्देशीय मंडळ, पुनर्जीवन फाऊंडेशन यांसह विविध संस्था- संघटनांनी केले आहे.२७० पोलीस कर्मचारी, ३४ अधिकाऱ्यांसह राज्य राखीव पोलीस दलाचे १९० कर्मचारी व सात अधिकारी परतवाडा शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. शहरातील संचारबंदी व कलम १४४ मुळे या तैनात पोलीस कर्मचारी पहाटेच्या चहा, नास्त्यापासून तर दुपारी व सायंकाळच्या जेवणापासूनही वंचित राहिलेत. यातील काहींना ४८ तासांत झोपदेखील घेता आली नाहीत.

टॅग्स :Murderखून