अमरावती : पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला धमकी देऊन विनयभंग केल्याची घटना बुधवारी बापटवाडी परिसरात उघडकीस आली. कपिल जैन (४० रा. बापटवाडी) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी महिला व आरोपी हे एकाच अपार्टमेंटमध्ये राहत असून, कपिल जैनच्या त्रासापायी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी कपिलने महिलेला धमकी देऊन अश्लील शिवीगाळ व हातवारे करून विनयभंग केला. तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी कपिल जैनविरुध्द गुन्हा नोंदविला.
00000000000000000000000000
महाविरनगरात जुगार पकडला
अमरावती : राजापेठ पोलिसांनी बुधवारी महाविरनगरात जुगार अड्ड्यावर धाड टाकून पाच जणांना अटक केली. विनोद कन्हैयालाल गुप्ता (४०), वासुदेव महादेव सुने (६०), मधुकर शामराव बोचरे (६५), विठ्ठल हरिभाई सगणे (३८ चारही रा. देशपांडे प्लॉट), धनंजय देवराव सावरकर (२७) व प्रदीप घुरु बोयत (३४ दोन्ही रा. महाविरनगर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १,९६० रुपयांचे जुगार साहित्य जप्त केले. त्यांना समजपत्रावर सोडण्यात आले.
000000000000000000000
गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
अमरावती : गळफास घेऊन एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील वरुडा गावात उघडकीस आली. ज्ञानेश्वर महादेव पिसे (४८ रा. वरुडा) असे मृताचे नाव आहे. रवींद्र ज्ञानेश्वर पिसे (२८ रा. दाभा) यांच्या माहितीवरून बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. घटनेचा प्राथमिक तपास पोलीस हवालदार इकबाल यांनी केला.