अमरावती: नळाचे पाणी सोडण्याकरिता फिर्यादी बांधावर गेले असता, ब्लिचिंग पावडरच्या कारणावरून वाद होऊन आरोपीने युवकास शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. ही घटना भातकुली ठाण्याच्या हद्दीत गणोजादेवी येथे २२ फेब्रुवारी रोजी घडली. भातकुली पोलिसांनी गुरुवारी पाडुरंग किसन नांदणे ( रा. गणोजादेवी) विरुद्ध भादंविचे कलम २९४, ५०४,५०६(ब) अन्यवे गुन्हा नोंदविला.
------------------------------------------------
विनामास्क पानटपरी सुरू ठेवल्याप्रकरणी गुन्हा
अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाही विनामास्क हातगाडीवरील पानटपरी सुरू ठेवल्याप्रकरणी खोलापुरीगेट पोलिसांनी एका युवकाविरुद्ध भादंविचे कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविला. ही कारवाई साबणपुरा गेटच्या बाजूला गुरुवारी करण्यात आली. आरोपी इरफान खान अमजद खान (३२, रा. रहमतनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
-----------------------------------------
शेतात मेंढ्या शिरल्या, युवकाला शिवीगाळ
बडनेरा : शेतात मेंढ्या शिरल्याच्या कारणावरून चार आरोपींनी रायपूर पांढरी बसस्थानकावर गुरुवारी एका युवकाला शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी राजेंद्र रामराव गुल्हाने (३९), सुशील चव्हाण (३०), पवन अनिल गुल्हाने (२२), चेतन प्रमोद शिंगणे (२५, रा. मलकापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सागर विलास कोकरे (२१, रा. पळसखेडा, ता. चांदूर रेल्वे) याने बडनेरा पोलिसांत तक्रार नोंदविली.
-------------------------
समाजमंदिराच्या कामावरून शिवीगाळ
अमरावती : समाजमंदिराचे काम करू देणार नाही, असे म्हणत एका इसमाला शिवगाळ करण्यात आली. मासोद येथे गुरुवारी घडलेल्या घटनेप्रकरणी श्रावण नामदेव वंजारी याच्याविरुद्ध राजेंद्र शंकराराव खंडारे (५२, रा. मासोद) यांनी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली.
--------------------------------------------------
बेनोडा येथे दारू पकडली
अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी येथील बेनोडा येथे कारवाई करून १९७६ रुपयांची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. रोहित उर्फ नादो विजय भोंगाडे (२७, रा. बेनोडा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.