शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बहुसदस्यीय प्रभागात ‘तू-तू, मै-मै’ चा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 00:09 IST

पुढील वर्षीच्या पूर्वार्धात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाने बहुसदस्यीय प्रभाग प्रणालीला हिरवी झेंडी दिली आहे.

राजकीय तोटा : श्रेयवादाची लढाईअमरावती : पुढील वर्षीच्या पूर्वार्धात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाने बहुसदस्यीय प्रभाग प्रणालीला हिरवी झेंडी दिली आहे. एका प्रभागातून दोन महिला आणि दोन पुरुष असे चार नगरसेवक निवडून जातील. मात्र चारही नगरसेवक एकाच प्रभागाचे प्रतिनिधित्व करणार असल्याने परस्परात तू-तू, मै-मै होण्याची चिन्हे आहेत. प्रभाग विकासाची जबाबदारी सांघिक असल्याने यात नागरिकांचे खऱ्या अर्थाने गोची होण्याची भीती जाणकार सूत्रांकडून व्यक्त होत आहे.राज्य सरकारने सर्व महापालिकेसाठी चार सदस्यीय प्रभागाची अधिसूचना मे च्या तिसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध केली. त्यावर आता साधकबाधक आणि तेवढ्याच संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. चार पैकी कुणीही जबाबदारी घेणारही नाही आणि पूर्णपणे झटकणार नाही. अशा परिस्थितीत तीस हजारी प्रभागातील समस्या आणि मतदारांचा वाली कोण असेल? यावर चर्वितचर्वण होत आहे. महापालिकेच्या प्रत्येक चेंबरमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धतीवर चर्चा झडत असून बड्या पक्षांच्या सदस्यांव्यतिरिक्त बहुतांश जण या चार प्रभाग पद्धतीचे तोटे मोठ्या कसोशीने मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. रिपाइं पाठोपाठ अन्य अपक्ष व छोट्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या अध्यादेशातील महापालिकेसंदर्भातील तरतुदीला आव्हान देण्याचा पवित्रा जाहीर केला आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचे समर्थन करताना नानाविध फायदे आणि लोकशाही सुदृढ होण्याचा दावा केला जात असताना संभाव्य परिणामही दृष्टीआड करता येणार नाही. महापालिकेच्या सन २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग होता. त्यावेळी एका प्रभागात निरनिराळ्या पक्षांचे नगरसेवक निवडून आल्याने विकास कामावरून वाद उफाळल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे २००७ च्या निवडणुका एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने झाल्या तर २०१२ मध्ये पुन्हा द्विसदस्यीय प्रभाग पद्धती कार्यान्वित झाली. या रचनेमध्ये तर एकाच प्रभागात निवडून आलेल्या एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांमध्ये फारसे सख्य नसल्याचे दिसून येत आहे. यात नागरिकांची मात्र उगाचच फरफट होत असल्याचे चित्र आहे. चारचा प्रभाग झाल्यानंतर यात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. आताच्या द्विसदस्यीय प्रभाग प्रणालीमध्ये अनेक ठिकाणी वरिष्ठ आणि अनुभवी नगरसेवक तुलनेत नवख्या नगरसेवकांचा निधी आपल्याच कामांसाठी वळवीत असल्याचे प्रतिनिधीक उदाहरणे आहेत. चार सदस्यीय प्रणालीमध्ये त्यात भर पडणार असल्याचे साशंक भीती महापालिका वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)