शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी, खंडणीची मागणी

By admin | Updated: February 24, 2017 00:18 IST

महिलेच्या हॅन्डबॅगमध्ये आढळलेल्या मोबाईलमधून तीचे खासगी छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० हजारांची खंडणी मागितल्याची

दोन आरोपींना अटक : गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाईअमरावती : महिलेच्या हॅन्डबॅगमध्ये आढळलेल्या मोबाईलमधून तीचे खासगी छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० हजारांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघड झाली. याप्रकरणात गुन्हे शाखेने उज्वल अशोक गजभिये (२८) व सुशील भीमराव गयभिये (२४, दोन्ही राहणार माधान, चांदूरबाजार) या दोन आरोपींना अटक केली आहे. पोलीस सुत्रानुसार २९ डिसेंबर २०१६ रोजी शहरातील एका महिलेची हॅन्डबॅग फे्रजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरविली होती. यासंदर्भात तीने पोलिसांकडे तक्रार केली होती. तिच्या हॅन्डबॅगमध्ये मोबाईल व काही महत्त्वाची कागदपत्रे व ६०० रुपयांची रोख होती. १५ फेब्रुवारीला या महिलेला एका अज्ञात क्रमांकावरून कॉल आला व त्या इसमाने महिलेला तिचे खासगी छायाचित्रे व्हायरल न करण्यासाठी ५० हजारांची खंडणी मागितली. या प्रकाराबद्दल त्या महिलेने गुन्हे शाखेचे एपीआय कांचन पांडे यांच्याशी संपर्क साधून आपबिती कथन केली. पांडे यांच्या चौकशीदरम्यान आरोपी हे चलाख असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान २२ फेब्रुवारीला पुन्हा त्या महिलेला एक कॉल आला. यावेळी पोलिसांनी या क्रमांकाचे लोकेशन घेतले असता हा कॉल चांदूरबाजार येथील एका कॉईन बॉक्सवरून आल्याचे त्यांच्या लक्षात आले व पोलिसांनी त्या कॉईन बॉक्सजवळ सापळा रचला. पोलीस हवालदार सहस्त्रबुद्धे व पोलीस शिपाई मनीष गवळी यांनी त्या कॉईन बॉक्सवर पाळत ठेवली व पुन्हा कॉल करण्यास आलेल्या त्या खंडणीबहाद्दरांना जागीच पकडले. चौकशीनंतर पोलिसांनी त्याच्या साथीदाराला सुद्धा अटक केली व त्यांचेजवळून मोबाईल, मेमरी कार्ड व दोन दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, एपीआय कांचन पांडे, पीएसआय प्रवीण वेरुळकर, पोलीस शिपाई सुभाष पाटील, संग्राम भोजने, राजेश बहिरट यांनी केली. याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुध्द भादंविच्या कलम ३८४, ३८५, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या आरोपींजवळून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)