शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

शेतकऱ्यांना कोरडवाहूसाठी हेक्टरी साडेचार हजार

By admin | Updated: January 13, 2015 22:52 IST

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील कोरडवाहू, बागायती आणि फळबागधारक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन नेहमीच्या

अमरावती : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील कोरडवाहू, बागायती आणि फळबागधारक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन नेहमीच्या पद्धतीप्रमाणे केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी ४ हजार ५०० रूपये, बागायती क्षेत्राला हेक्टरी ९ हजार तर फळबागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी १२ हजार ५०० रूपयांची मदत प्रस्तावित केली आहे. अल्प आणि बहू भूधारकांना दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत दिली जाणार आहे. जिल्ह्यातील व अन्य भागात दुष्काळसदृष्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे पीक आणि फळबागाचे झालेले नुकसान लक्षात घेता त्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने चार हजार कोटी रूपये निधी मागण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला होता. यासाठी ३० पानांचे सविस्तर निवेदन तयार केले होते. सदर प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठविला असता महसूल व कृषी विभागाने जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली असून विभागीय आयुक्त यांच्याकडून त्याबाबतचे अहवाल पाठविण्यात आला होता. सदर प्राप्त अहवालांचे अवलोकन केल्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने सुमारे चार हजार कोटी रूपये केंद्राकडे मागण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कोरडवाहू अल्पभूधारकांना प्रति हेक्टरी ४ हजार ५०० रूपये मदत देण्याचा निकष आहे. अल्पभूधारकांना प्रति हेक्टरी ९ हजार रूपये मदत देण्याचा निकष आहे. या प्रकाराच्या नुकसानग्रस्त भागाचे जेवढे क्षेत्र अमरावतीसह राज्यभरात २ लाख ७७ हजार १७८ हेक्टर आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ३६२ कोटी २९ लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच बागायत बहूभुधारकांच्या एकूण ५८,५४० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी २४८ कोटी ९३ लाख रूपयांची मागणी करण्यात येणार आहेत. बहूवर्षी फळपिके घेणाऱ्या अल्पभुधारकांना प्रति हेक्टरी १२ हजार ३०० रूपये मदत देण्याचा निकष आहे. या प्रकारच्या नुकसानग्रस्त भागाचे क्षेत्र ८६.०६४ हेक्टर आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १९९ कोटी ९० लाख रूपयांची मागणी केली होती. याशिवाय बहुवर्षीय फळपिके घेणाऱ्या बहूभुधारकांच्या एकूण ४४,११७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ७४ कोटी ७५ लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र दोन हजार कोटीचेच पॅकेज तूर्तास जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही तूटपुंजी असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)