शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

खोटी स्वाक्षरी करुन हडपले हजारो रुपये

By admin | Updated: May 18, 2016 00:17 IST

निमगव्हाण येथे मजुरांच्या नावे खोटे हजेरीपट भरुन व सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांच्या खोटया सह्या करुन २८ हजार ७०० रुपयांचा अपहार केल्याची तक्रार

पोलिसांत तक्रार : भ्रष्टाचाराला राजकीय वरदहस्त?चांदूररेल्वे : निमगव्हाण येथे मजुरांच्या नावे खोटे हजेरीपट भरुन व सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांच्या खोटया सह्या करुन २८ हजार ७०० रुपयांचा अपहार केल्याची तक्रार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.याप्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिकारी, ठाणेदार व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतरही त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, याप्रकरणी दोषी व्यक्तिंना राजाश्रय मिळत असून प्रशासन पाठबळ देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. निमगव्हाण येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत केलेल्या कामांमध्ये मजुरांची बनावट नावे टाकून व सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांच्या खोटया सहया करुन २८ हजार ७०० रुपयांचा अपहार केला. ही बाब २५ फेब्रुवारी २०१६ च्या मासिक सभेत सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य यांच्या उपस्थितीत चर्चेला आली. सर्वानुमते प्रत्यक्षदर्शीला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिलीत. हे प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून त्याने सभागृहात आत्महत्या करून सर्वांना फसविण्याची धमकी दिली. ही बाब निर्देशित करुन कारवाईची मागणी निवेदनाद्वारे तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात करण्यात आली. परंतु तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने रजिस्टर पोस्टाने ती तक्रार पाठविण्यात आली. १६ एप्रिल रोजी आयोजित ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत विषय क्र.१० अन्वये रोजगार पदावरुन काढण्यात यावे, असा ठराव सर्वानुमते पारीत केला. तक्रारीची दखल तळेगाव पोलिसांनी न घेतल्याने चांदूर रेल्वे उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, मुख्यकार्यपालन अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली. याउपरही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दोषी रोजगार सेवकाला प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून वरिष्ठांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)