शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिवगडावर हजारो मावळे नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषाने सोमवारी शहर दुमदुमले. यानिमित्त ...

ठळक मुद्देवाहन रॅली, शोभायात्रा, ढोलपथकांनी वेधले लक्षशिवरायांच्या जयघोषाने दुमदुमली अंबानगरी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषाने सोमवारी शहर दुमदुमले. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले. मुख्य मार्गांनी भगवे फेटे बांधून युवकांनी दुचाकी रॅली काढली. येथील शिवगड (शिवटेकडी) येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शिवजयंती उत्सव समिती व महापालिकेतर्फे छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले.शहरातील शिवगडावर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष डॉ. बबनराव बेलसरे आणि प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक तथा कीर्तनकार नितीन मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला. उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. व्यासपीठावर, शिवटेकडी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश बूब, नगरसेविका रीता पडोळे, उद्योजक तथा नगरसेवक नितीन देशमुख, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित ठोसरे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शीला पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रणजित तिडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.याप्रसंगी मान्यवरांसह शिवपे्रमींनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला सुरेंद्र भुयार, मयूरा देशमुख, सचिन चौधरी, अरविंद गावंडे, नीलिमा विखे, प्रीती बुजरूक, अविनाश कोठाडे, मोनाली तायडे, प्रतिभा देशमुख यांच्यासह संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, मराठा कुणबी संघटना व इतर संघटनांचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लक्षवेधी सहभागशिवरायांचा इतिहास हा सर्वांना प्रभावित करतो. देशप्रेमाची धारा रोमरोमांतून वाहती ठेवणाऱ्या या इतिहाराची धुरा यंदाच्या शिवजयंती रॅली युवा वर्ग, विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वाहिली. सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांचा पुतळा वाहनावर चढवून शहरातून प्रमुख मार्गांनी मिरवणूक काढली, प्रो. राम मेघे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दुचाकी रॅली काढली. सायन्स कोअर मैदानातून रॅलीला प्रारंभ झाला, तर आपआपल्या महाविद्यालयांमध्ये रॅलीचा समारोप झाला. विद्यार्थिनींचा पारंपरिक पहेराव व विद्यार्थ्यांचे सफेद कुर्त्यावर भगवे फेटे अमरावतीकरांचे लक्ष वेधून घेत होते. ढोलताशा पथकासह शिवरायांचा गगनभेदी जयघोषामुळे आसमंत दुमदुमला. राजकमल चौकात मेघे अभियांत्रिकीच्या तलवारधारी विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या युद्धकौशल्याचे प्रात्यक्षिक सादर करून वाहवा मिळविली.शिवटेकडी नव्हे शिवगडशिवजयंतीनिमित्त येथील शिवटेकडीवर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शिवजयंती कार्यक्रम मंगळवारी सकाळी साजरा झाला. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित ठोसरे यांच्यासह जिल्हा सचिव उज्ज्वल गावंडे व मयूरा देशमुख यांनी शिवटेकडीऐवजी ‘शिवगड’ असे नामाधिदान करण्यात यावे, यासाठी आवाज बुलंद केला. याविषयी महापालिका आयुक्तांना निदेवन देण्यात येणार आहे.