शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

साठेबाजांनी धाडसत्रापूर्वीच केली हजारो क्विंटल डाळ लंपास

By admin | Updated: October 27, 2015 00:26 IST

तूर डाळीचे भाव गगणाला भिडले असून गोरगरिबांच्या जेवणातून तुर डाळ हद्दपार होत आहे.

अधिकाऱ्यांना आढळली ९२९ क्विंटल तूर डाळ : पथक रित्या हाताने परतलेवरूड : तूर डाळीचे भाव गगणाला भिडले असून गोरगरिबांच्या जेवणातून तुर डाळ हद्दपार होत आहे. शासनाने साठेबाजाविरुद्ध मोहीम सुरु असून तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने धाडसत्र राबविण्यापूर्वीच हजारो क्विंटल डाळ रफादफा केल्याची घटना तालुक्यात घडली. यामुळे धाडसत्रादरम्यान महसूल विभागाला रित्या हाताने परतावे लागले. परंतु हजारो क्विंटल तूरडाळ गेली कुठे? या विषयाची चर्चा आहे.तालुक्यात ठोक व्यापाऱ्यांनी तूर डाळीचा हजारो क्विंटल साठा गोदामात ठेवला होता. अचानक भाव वाढल्याने दैनंदिनीतून डाळ हद्दपार झाली. विवाह सोळके, सार्र्वजनिक कार्यक्रमातसुध्दा तूर दाळ दिसत नाही. एवढेच नव्हे तर नवरात्री उत्सवातसुध्दा तुरीच्या डाळीऐवजी चना डाळ वापरण्यात आली. १८० ते १७० रुपये भावाने तुरीची डाळ विकली जात होती. राज्य शासनाने तूरडाळ साठेबाजांविरुध्द कारवाईची मोहीम सुरू केली. व्यापाऱ्यांच्या गोडावूनची तपासणी करून धाडसत्र राबविले. परंतु आधीच विल्हेवाट लावल्याने तहसीलदार, पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना रित्या हाताने परतावे लागले. अखेर हजारो क्विंटल डाळ गेली कुठे, हा चर्चेचा विषय आहे. पुरवठा विभागच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील ११ व्यापाऱ्यांकडे धाड टाकली. एका दालमिलमध्ये ९२० क्विंटल, एका व्यापाऱ्यांकडे दीड क्विंटल तूरडाळ आढळून आली. धाडसत्राची कुणकुण लागताच हजारो क्विंटल तूरडाळ साठेबाजांनी कुठे लपविली, हा चर्चेचा विषय बनला आहे. खासगीमध्ये ५ ते १० हजार क्विंटल तुरीच्या डाळीचा साठा असल्याचे बोलल्या जाते. मात्र यापलिकडे साठेबाजी सुरू असते. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.साठवणूक आढळल्यास कारवाईमहसूल विभागाच्या धाडसत्रात ९ हजार ३१३ क्विंटल चना, १४ हजार ३५६ क्विंटल सोयाबीन,९२९.७ क्विंटल, तूर डाळ, २१ हजार ५१० लिटर खाद्यतेल, ५ हजार ३९९ क्विंटल साखर, २ हजार १२३ क्ंिवटल एरंडी एवढा साठा आढळून आला. साठवणुकीकरिता परवानाधारक व्यापाऱ्यांना नगरपरिषद हद्दीत तेल ३०० क्विंटल, डाळी एक हजार ५०० क्ंिवटल, तसेच खाद्य तेलबिया ८०० क्विंटलपर्यंत साठवून ठेवता येते. याव्यतिरिक्त अतिरिक्त साठवणूक आढळली तर कायदेशीर कारवाई करण्याचे प्रावधान आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे धान्याची साठेबाजी करणाऱ्यांची तपासणी सुरू आहे. मर्यादेपेक्षा जास्त साठा आढळल्यास त्यांचा लिलाव केला जाईल.- पुरुषोत्तम भुसारी, तहसीलदार, वरुड.