शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

तापी नदीतून हजारो ब्रास रेती, बजरीचे खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:16 IST

महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सीमारेषा म्हणून ओळख असलेल्या तापी नदीपात्रातून हजारो ब्रास रेती आणि बजरीचा उपसा करण्याचा सपाटा सुरू आहे.

ठळक मुद्देउदर पोखरले : महाराष्ट्राच्या सीमेतील नदीपात्रातून अवैध उपसा, महसूलची मूकसंमती

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सीमारेषा म्हणून ओळख असलेल्या तापी नदीपात्रातून हजारो ब्रास रेती आणि बजरीचा उपसा करण्याचा सपाटा सुरू आहे.तालुक्यापासून ३० किलोमीटर अंतरावर वैरागड आणि कुटंगा दरम्यान उत्तरेकडे पूर्व-पश्चिम असे तापी नदीचे पात्र आहे. निर्धोक वाहतुकीसाठी नदीच्या नावघाटावर पूलनिर्मिती करण्यात आली. या पुलाची महाराष्ट्रातील कामे पूर्ण झाली, तर मध्य प्रदेशातील कामे अपूर्ण आहेत. त्या पुलावरून रेतीची चोरटी वाहतूक बिनदिक्कत सुरू आहे.मध्य प्रदेशात सुरू असलेल्या या पुलाच्या बांधकामासाठी रेती व बजरीची गरज आहे. सध्या महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील घाटांचे लिलाव न झाल्यामुळे कुठेही रेती उपलब्ध नाही. सबब, या पुलाच्या पूर्व आणि पश्चिम दिशेने तापी नदीपात्रात जेसीबी लावून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती खनन सुरू आहे.पात्रात एक किमी परिसरात अवैध उत्खनन दिसून आले. उत्खननामुळे ठिकठिकाणी १० ते १५ फुटांपर्यंत मोठे खड्डे पडले आहेत.जेसीबी चालकाने काढला पळएका जेसीबीद्वारे बजरी व दगडाचे अवैध उत्खनन सुरू असल्याचे १३ डिसेंबर रोजी सायंकाळी आढळले. चार ट्रॅक्टरद्वारे ती तस्करी होणार होती. अवैध उत्खननाची छायाचित्रे व व्हिडीओ घेतल्याचे लक्षात येताच संबंधिताने जेसीबी झपाट्याने नदीपात्रातून बाहेर काढून मध्य प्रदेशकडे पळ काढला. .महसूल विभागाशी लागेबांधेरेतीचा बिनबोभाट उपसा होत असताना, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील महसूल विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे. रेतीचोरीला अटकाव घालण्याबाबत उपविभागीय अधिकारी आणि तहसील स्तरावरील भरारी पथक अस्तित्वशून्य ठरले आहेत.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कारवाईमहसूल विभागाने बुधवारी रेतीची अवैध वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर जप्त केले. त्यांच्याविरुद्ध चोख कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार किशोर आखरे यांनी सांगितले. ही कारवाई जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केल्यानंतर करण्यात आली, हे विशेष.रेती तस्करी ही अत्यंत गंभीर बाब आहे. नदीपात्रात अवैध उत्खनन, जेसीबीचा वापर हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिलेत. लवकरच मोठी कारवाई करू.- दिलीप कर्डिले, उपविभागीय अधिकारी