शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' सरपंच कुटुंबांना अद्यापही मदत नाही

By admin | Updated: February 15, 2016 00:35 IST

आपले संपूर्ण आयुष्य गाव विकासासाठी अर्पण केल्यानंतर आज ही ना शासनाने ना प्रशासनाने कोणतीही मदत देण्यासाठी पुढाकार घेतला नाही.

अपघाताला दोन वर्ष पूर्ण : भीषण अपघाताच्या आठवणी आजही कायममोहन राऊत  धामणगाव रेल्वेआपले संपूर्ण आयुष्य गाव विकासासाठी अर्पण केल्यानंतर आज ही ना शासनाने ना प्रशासनाने कोणतीही मदत देण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्या पाचही सरपंचाच्या कुटुंबांतील सदस्य शासकीय मदतीसाठी लालफीत शाहीचा दरवाजा ठोठावत आहेत़ सर्वांनी दिलेले त्यावेळेचे आश्वासन हवेतच विरले असल्याची खंत या कुटुंबांनी व्यक्त केली आहे़ दोन वर्षांपूर्वी १५ फेब्रुवारी रोजी रात्री जळगाव येथे सरपंच परिषदेला जात असताना चिखलीजवळ स्कार्पिओ वाहन झाडावर आदळल्याने यात जुना धामणगाव येथील सरपंच प्रवीण गुल्हाने, वाठोड्याचे सरपंच नरेंद्र बहुरूपी, ढाकुलगावचे सरपंच मंगेश म्हात्रे व गुंजी येथील रहिवासी अरूण टाले हे जागीच ठार झाले होते़ दीड महिन्यांनी या अपघातात जखमी झालेले झाडा येथील सरपंच अतुल कोंबे यांची प्राणज्योत उपचारा दरम्यान मालवली होती़ या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाले असतानाही कोणत्याच प्रकारची शासनाने मदत केली नसल्याचे तालुक्यातील चारही सरपंचांचा संसाराचा गाडा केवळ शेतीच्या भरवशावर चालत होता़ वर्षभर शेतात राबून आलेल्या उत्पादनातून जन्मदात्यासोबत आपल्या कुटुंबांचा खर्च चालविताना त्यांना मोठ्या कसरतीला सामोरे जावे लागत होते. ग्रामपंचायतमधील पाणीपुरवठ्याचे थकीत वीज बिल भरले नाही, तर दुसऱ्या दिवशी गावातील वीजपुरवठा खंडित होतो त्यामुळे वेळप्र्रसंगी उसनवारीचे पैसे घेवून गावातील वीज देयक भरण्यासाठी या सरपंचासह गुंजी येथील मृत अरूण टाले यांचा पुढाकार राहत असे. घरावर तुळशीपत्र ठेवून गावाच्या विकासासाठी धावणारे व्यक्तिमत्त्व म्हणून तालुक्यात या पाचही जणांची ओळख होती़ या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाले असले तरी या कुटुंंबातील बोबडे शब्द आजही अनेक प्रश्न करीत आहे़ मात्र, त्यांना या नियतीच्या चक्रव्यूहामुळे एकच उत्तर कुटूंबप्रमुखाला द्यावे लागत आहे़ जुना धामणगाव येथील अपघातात ठार झालेल्या प्रवीण गुल्हाने यांचा छोटा मुलगा हिमांशू व मुलगी हे आपल्या आईला आजही वडिलांविषयी अनेक प्रश्न विचारतात. हीच स्थिती वाठोडा येथील मृत सरपंच नरेंद्र बहुरूपी तसेच झाडा येथील मृत सरपंच अतुल कोंबे यांच्या घरची आहे़