शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ निर्दयी दाम्पत्याला अटक

By admin | Updated: August 4, 2016 00:02 IST

रामा गावात १० जुलै रोजी स्त्री अर्भक जमिनीत पुरल्याची घटना उघडकीस आली होती.

स्त्रीअर्भक जमिनीत पुरले : रामा गावातील घटना अमरावती : रामा गावात १० जुलै रोजी स्त्री अर्भक जमिनीत पुरल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणातील ‘त्या’ निर्दयी दाम्पत्याला वलगाव पोलिसांनी मंगळवारी अटक केली.न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामा गावातील रहिवासी सुधाकर पंजाब जुनघरे यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेत काही श्वान स्त्री जातीच्या अर्भकाचे लचके तोडत असल्याचे पोलीस पाटील नितीन बबन तेलखडे यांना आढळून आले. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपिंविरूद्ध भादंविच्या कलम ३१८ अन्वये गुन्हा नोंदविला. स्त्री भ्रुणहत्येविषयी शासन कठोर असतानाही जिल्ह्यात स्त्रीअर्भकांच्या हत्येचे प्रकार उघडकीस येत आहेत. वलगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.पी. सोनवणे यांनी तपासाची सूत्रे वेगाने हलविली.तिसरी मुलगीच झाल्याचा संतापअमरावती: पोलिसांनी काही दिवसांत मृत अर्भकाच्या आई-वडिलांचा शोध घेतला. निर्दयी आई-वडिलांनी तिसरी मुलगी झाल्यामुळे संतापून ते स्त्रीअर्भक जमिनीत पुरले होते. ही माहिती समोर येऊनही पोलिसांनी आरोपीला अटक केली नव्हती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. तत्काळ दखल घेत गुन्हे शाखेच्या पथकाने रामा गावात जाऊन चौकशी सुरु केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याकडे लक्ष वेधून तत्काळ कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार वलगाव पोलिसांनी मंगळवारी आरोपी सुभाष देवीदास जुनघरे या (४८) दाम्पत्याला अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रामा येथील सुभाष जुनघरे दाम्पत्याला आधीच दोन मुली व एक मुलगा आहे. सुभाष यांची पत्नी आठ महिन्यांची गर्भवती होती.घटनेच्या दिवशी त्यांच्या पोटात कळा आल्या. मात्र, त्यांनी रुग्णालयात न जाता शेजारच्यांना बोलावून घरातच प्रसूती करून घेतली. मृत बाळ जन्मल्याने त्यांनी ते जमिनीत पुरले, अशी माहिती जुनघरे दाम्पत्याने पोलिसांना दिली आहे. स्त्री अर्भक जमिनीत पुरल्याप्रकरणातील दाम्पत्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाच्या आदेशाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. - एस.पी.सोनवणे,पोलीस निरीक्षक, वलगाव पोलीस ठाणे.