शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

'त्या' चार मधुमेहींसाठी डॉक्टरच बनले देवदूत

By admin | Updated: June 23, 2015 00:49 IST

तालुक्यातील एकूण चार किशोरवयीन, जन्मजात आणि आर्थिक ऐपत नसणाऱ्या मधुमेहींना ...

मदतीचा हात : इन्सुलीन व्हायरल पुरवितात महिन्याला नि:शुल्कमोर्शी : तालुक्यातील एकूण चार किशोरवयीन, जन्मजात आणि आर्थिक ऐपत नसणाऱ्या मधुमेहींना अमरावतीच्या दानदात्यांमार्फत दरमहा जवळपास अडीच हजार रुपयांचे इन्सूलीन व्हायरल मोफत पुरविली जात आहे. येथील रशिक अहेमद हा १५ वर्षांचा मुलगा जन्मजात मधुमेहीचा रुग्ण आहे. त्याच्या लहानपणात माता-पित्यांचे निधन झाले. निराधार झालेला रशिक त्याच्या भावासह आजोबांकडे राहतो. खेड गावातील सारिका, सुनीता या किशोरवयीन मुली मधुमेहाने आजारी आहेत. याशिवाय काहीशा विमनस्क असलेल्या प्रतिभा या ३५ वर्षीय तरुणीला तिच्या आजीने आसरा दिला. रशिकसह हे सर्व रुग्न अगदी बालपणापासूनच मधुमेहाचे रुग्ण आहेत. सर्वांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे.येथे नोकरीत असताना रुग्णांंच्या भल्यासाठी धडपड करणारे डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याशी या रुग्णांच्या नातेवाईकांनी संपर्क करुन त्यांचे मार्गदर्शन घेतले.रुग्णांवर मधुमेहाच्या गोळयांचा कोणताही सकारात्मक परिणाम होणार नसल्यामुळे डॉ.निकम यांनी त्यांना दरदिवशी इन्सूलीनचे इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला. प्रत्येक रुग्णाला दरमहा ५६० रुपयांचे ३ ते ४ इन्सूलीनचे व्हायरल लागतात. या चारही रुग्णांच्या नातेवाईकांना ‘दोन वेळच्या भोजनाची सोय नाही. इंजेक्शन आणायचे कोठून, असा प्रश्न डॉ. निकम यांच्या समोर उपस्थित केला. रुग्णांवर योग्य उपचार झाले नाही तर ते मृत्युच्या दाढेत जाणार असल्याची संवेदना डॉ.निकम यांना होती. यातून मार्ग काढून त्यांनी अमरावती येथील त्यांचे मित्र डॉ.अरुण हरवाणी यांच्यासमोर या चारही रुग्नांची परिस्थिती कथन केली व मदतीची अपेक्षा व्यक्त केली. डॉ.हरवाणी यांनी त्यांच्या संपर्कातील एका दानदात्याला माहिती देऊन सहकार्याची विनंती केली. या दानदात्याने लगेच होकार देऊन दरमहा लागेल तेवढे इन्सूलीन मोफत पुरविण्याची तयारी दर्शविली; तथापि आपले नाव उघड न करण्याचे आणि कोणतीही प्रसिध्दी न देण्याची गळ डॉ.हरवाणी यांना घातली. काही महिन्यांपासून हा दानदाता दरमहा डॉ.अरुण हरवाणी यांना इन्सूलीन व्हायरल उपलब्ध करुन देतो. त्यांच्याकडून डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यामार्फत या रुग्णांना देण्यात येतात. परिणामी या चारही रुग्णांच्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा सुधारणा होत आहे. (तालुका प्रतिनिधी)चमकोगिरी करणारे धडा घेतील का ! स्वत:च्या प्रसिध्दीसाठी फ्लेक्स छापून, सार्वजनिक रुग्णालयात रुग्णांना पाचशे-सातशे रुपयांचे फळवाटप करुन आपण फार मोठे उपकार केल्याची भावना बाळगून छायाचित्रांसह प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न करणारी मंडळी समाजात आहे. दुसरीकडे या गरजू व गरीब रुग्णांना दरमहा जवळपास अडीच हजार रुपयांचे इन्सूलीन पुरविणारा दानदाता मात्र प्रसिध्दीपासून दूर राहण्याची धडपड करीत आहे. समाजाप्रती आपली काही जबाबदारी आहे. या सद्हेतूने या दानदात्याच्या कर्तव्याचा धडा चमकोगिरी करणारे घेतील का, हा खरा प्रश्न आहे.