शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' दारूविके्रेत्यांची सीपींसमोर पेशी

By admin | Updated: July 27, 2016 00:04 IST

दारू विक्रेत्यांच्या मुजोरीला वैतागलेल्या गणोरीवासियांनी अवैध दारूचा मुद्दा थेट पोलीस आयुक्तांसमक्ष मांडल्याने त्यांनी मंगळवारी दारू विक्रेत्यांना हजर करण्याचे आदेश दिले होते.

प्रभाव महिलाशक्तीचा : गणोरीतील अवैध दारूविक्रीचा मुद्दा अमरावती : दारू विक्रेत्यांच्या मुजोरीला वैतागलेल्या गणोरीवासियांनी अवैध दारूचा मुद्दा थेट पोलीस आयुक्तांसमक्ष मांडल्याने त्यांनी मंगळवारी दारू विक्रेत्यांना हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सहा दारू विक्रेत्यांना पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या कक्षात हजर केले असता आयुक्तांनी तीन दारू विक्रेत्यांना चांगलेच फटकारत चोप दिल्याची माहिती आहे. भातकुली तालुक्यातील गणोरी येथील शेकडो महिलांनी सोमवारी अवैध दारू विक्रीसंदर्भात एल्गार पुकारला. दारू विक्रेत्यांच्या मुजोरीला वैतागलेल्या महिलांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कैफियत मांडली. त्यांनीही तक्रारीची तत्काळ दखल घेत दारूविक्रेत्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले व त्यांना हजर करण्याचे फर्मान सोडले. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल किनगे यांच्या मार्गदर्शनातील पथकाने सहा दारू विक्रेत्यांना ताब्यात घेतले. दारू न विकण्याची ग्वाहीअमरावती : त्यात निजार खा मस्तान खा, सुभाष राणे, त्यांची पत्नी, विजय देठे, त्यांची पत्नी व दुर्गा वावरे यांचा समावेश आहे. मंगळवारी या सहा दारू विक्रेत्यांची पेशी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर करण्यात आली. त्यांनी दारू विक्रेत्यांना फटकारत तंबी देऊन पुरुष दारू विक्रेत्यांना चांगलाच चोप दिला. त्यामुळे दारू विक्रेत्यांनीही हात जोडून दारू न विकण्याची भूमिका दर्शविली. यापुढे आम्ही दारू विकणार नाही, अशी ग्वाही दारू विक्रेत्यांनी आयुक्तांना दिली. याप्रकरणात पोलिसांनी सहा आरोपीविरुद्ध कलम १०७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. मात्र, या प्रकरणामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणल्याची चर्चा शहरात सुरू होती. गणोरीवासीयांच्या उपस्थितीत दारू विक्रेत्यांना तंबी गणोरीतील महिलांनी कैफीयत ऐकून पोलीस आयुक्तांनी अवैध दारू विक्रेत्यांना हजर करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले. सोबतच दारू विक्रेत्यांना हजर केल्यानंतर गणोरीतील महिलांनीही उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी आठ ते दहा महिलांनी पोलीस आयुक्तालयात हजेरी लावली. गुन्हे शाखेने सहा दारू विक्रेत्यांना पोलीस आयुक्तांसमोर हजर केल्यावर गणोरीतील महिलांनासुध्दा कक्षात बोलाविण्यात आले. या महिलासमक्ष आयुक्तांनी अवैध दारू विक्रेत्यांना फटकारून तंबी दिली. ही बाब महिलांसाठी समाधानकारक ठरली आहे.