आरएफओंचे निर्देश : कर्तव्यात हयगय केल्यास प्रशासकीय कारवाईअमरावती : प्रादेशिक वनविभागाने २७ मे रोजी केलेल्या ७० वनरक्षकांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी काढले आहे. त्यामुळे बदली झालेल्या ठिकाणी वनरक्षकांना कार्यमुक्त झाल्याशिवाय पर्याय नाही, हे वास्तव आहे.वन विभागात स्थानिक वन कर्मचारी बदली समितीने ७० वनरक्षक, पाच वनपाल, पाच लिपीक, एक लेखापालांची बदली प्रक्रिया राबविली. यामध्ये ७० वनरक्षकांच्या बदली झाल्यानंंतरही काहींनी आपल्यावर अन्याय झाल्याचे कैफियत वरिष्ठांकडे मांडली. तीन ते चार वर्षे सेवा झालेल्यांना पुन्हा मेळघाटात बदली करण्यात आल्याची ओरड वनरक्षकांची आहे. त्याअनुषंगाने वनपाल- वनरक्षक संघटनेने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक दिनेशकुमार त्यागी यांची भेट घेवून झालेल्या अन्यायाची कैफियत मांडली. मात्र वनरक्षकांना आता बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी काढले आहेत. परिणामी १ जूनपासून कार्यमुक्त होऊन वनरक्षकांना बदली ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे. बदली झालेल्या वनरक्षकांमध्ये गत तीन वर्षांपूर्वी मेळघाटात सेवा देवून परतलेल्यांची पुन्हा मेळघाटात बदली करण्यात आल्याची कैफियत निवेदनाद्वारे मांडली. चांदूरबाजार, मोर्शी, परतवाडा वनपरिक्षेत्रात ५ ते ७ वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या वनरक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. वरिष्ठांकडे कैफियत मांडल्यानंतर काही तरी न्या मिळेल या आशेवर असलेल्या वनरक्षकांना आता थेट कार्यमुक्तीचे आदेश मिळाल्यामुळे न्यायाचे मार्ग बंद झाले आहे.डीएफओंनी केल्या १९ वनरक्षकांच्या अंतर्गत बदल्याअमरावतीच्या उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांनी १९ वनरक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. यात परतवाडा, वरुड, मोर्शी येथील वनपरिक्षेत्राचा समावेश आहे. वनविभागात सूसुत्रता आणण्यासाठी अंतर्गत बदल्या करण्यात आल्याची माहिती आहे.
‘त्या’ ७० वनरक्षकांना कार्यमुक्त होण्याचे आदेश
By admin | Updated: June 2, 2016 01:45 IST