शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्त कार्यालयातून चंदन झाडाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:25 IST

येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दर्शनी भागातील उद्यानातून रविवारी मध्यरात्री चंदन झाडाची कत्तल करण्यात आली. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक तैनात असताना चंदन वृक्षाची चोरी झाली कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयाचे नाझर राजू पेठे यांनी गाडगेनगर ठाण्यात सोमवारी तक्रार नोंदविली आहे.

ठळक मुद्देरविवारी रात्री कत्तल : गाडगेनगर पोलिसात तक्रार, चंदनचोर सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दर्शनी भागातील उद्यानातून रविवारी मध्यरात्री चंदन झाडाची कत्तल करण्यात आली. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक तैनात असताना चंदन वृक्षाची चोरी झाली कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयाचे नाझर राजू पेठे यांनी गाडगेनगर ठाण्यात सोमवारी तक्रार नोंदविली आहे.विभागीय आयुक्त कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी चंदन झाडाची चोरीस गेल्याची बाब नमूद केली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्यांनी लंपास केलेले चंदनाचे झाड हे परिपक्व होते. मात्र, अचानक झाड चोरीस गेल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बंगले, निवासस्थान परिसरातून चंदन झाडाची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. चंदनवृक्ष चोरीचे रॅकेट औरंगाबाद, अकोला येथील असल्याची विश्वसनीय माहिती आहे. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हा व सत्र न्यायाधीश, पोलीस अधीक्षक, मुख्य वनसंरक्षक आदी अतिमहत्त्वाच्या अधिकाºयांचे बंगले चंदन तस्करांनी लक्ष्य केले होते. मध्यंतरी पोलिसांनी प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांच्या वसाहती, बंगला परिसरात गस्त वाढविली होती. काही दिवस हा प्रकार थांबला होता. मात्र, पोलिसांनी रात्रची गस्त बंद करताच पुन्हा चंदन चोरटी शहरात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.वनविभागाची जबाबदारी वाढलीअमरावतीत पुन्हा चंदन तस्कर सक्रिय झाल्याच्या पार्श्वभूमिवर पोलिसांसह वन विभागाची जबाबदारी वाढली आहे. चंदनाची झाडे अधिकाºयांच्या वसाहतीत अथवा बंगल्यांमध्ये आहे. चंदनवृक्षांची कत्तल करण्यात तस्कर पटाईत आहेत. त्यांच्याकडे आवाजविरहीत साहित्य असल्यामुळे रात्रीला अवघ्या पाच मिनिटांतच ते झाडांची कत्तल करून मोहीम फत्ते करतात. सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यात धूळफेक करुन तत्क्षण चंदनवृक्ष चोरण्याचा प्रताप करतात.