चांदूर बाजार : आमची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नाही किंवा पोलिसांनी अकारण आम्हाला मारहाण केली. आदी प्रकारच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत असतात. अशा अनेक निरनिराळ्या तक्रारीत सुस्पष्टता यावी, आरोपांची खातरजमा करण्यात यावी, पोलीस कोठडीतील कच्च्या आरोपींच्या हालचालींवर लक्ष राहावे, याकरिता राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात कॅमेरे लावण्यात येणार आहे. पोलीस व पोलीस ठाण्यात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर ‘थर्ड आय’ची नजर राहणार आहे.
राज्यातील सर्वच पोलिस ठाण्यात आता हाय रिझोलेशनचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. हे कॅमेरे लावण्याचा कंत्राट दोन कंपन्यांना देण्यात आले आहे. आता पोलीस ठाण्याच्या परिसरातील सर्व हालचाली टिपण्यासाठी थर्ड आय कार्यान्वित होणार असून, ठाणेदारांच्या कक्षासह सर्वच कक्षांमध्ये कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यामुळे पोलीस अधिकारी कर्मचारी व नागरिकांसाठीसुद्धा एक प्रकारची सुविधा व सुरक्षा यामुळे प्रदान होणार आहे.
२४ बाय ७ सतत कार्यरत असणारे कार्यालय म्हणजे पोलीस ठाणे. या ठिकाणी सर्व प्रकारची मंडळीचे येणे-जाणे असते. तर अनेक जण पोलीस विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याची ओरड करतात. आमची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नाही किंवा पोलिसांनी विनाकारण आम्हाला मारहाण केली. आदि प्रकारच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत असतात, तर दुसरीकडे पोलिस विभागातील काही अधिकारी सुद्धा कर्तव्य बजावत असताना कसूर करतात. या सर्व बाबीवर कटाक्ष राखण्यासाठी आता राज्य शासनाने सर्व पोलिस ठाण्यांमध्ये उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी राहणार व्यवस्था
आवश्यकतेनुसार एका पोलीस ठाण्यात दहा ते पंधरा कॅमेरे लागणार आहेत. त्यामध्ये ठाणे प्रभारी अधिकारी यांचा कक्षही असेल. तसेच पोलीस ठाण्याची संपूर्ण इमारत, प्रवेशद्वार, स्टेशन डायरी अंमलदार, मुद्देमाल कक्ष, गुन्हेशोध कक्ष, दुय्यम अधिकारी कक्ष, शासन तपास कक्ष, ड्युटी आॅफिसर कक्ष, बंदी गृह, बिनतारी संदेश कक्ष आदींचा समावेश आहे. या कॅमेºयांमुळे पोलीस ठाण्यात येणारे तक्रारदार अथवा वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केलेले आरोपी आणि इतर नागरिकांच्या संपूर्ण हालचाली टिपणे, त्याचा रेकार्ड ठेवला जाणार आहे.
पान २ ची बॉटम