शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
2
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
3
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
4
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
5
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
6
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
7
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
8
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
9
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
10
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
11
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
12
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
13
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
14
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
15
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
16
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
17
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
18
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
20
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 

‘त्या’ आरागिरणीतील लाकूड मोजणीसाठी तिसरा दिवस उजाडला

By admin | Updated: September 22, 2016 00:14 IST

स्थानिक वलगाव मार्गावरील टॉवर लाईननजिकच्या नवदुर्गा आरागिरणीत आढळलेले अंदाजे १० ट्रक लाकूड मोजणीसाठी तिसरा दिवस उजाळला आहे.

४३ वृक्ष कापण्याची परवानगी : घटनास्थळी वृक्ष गोलाईचे करणार निरीक्षणअमरावती: स्थानिक वलगाव मार्गावरील टॉवर लाईननजिकच्या नवदुर्गा आरागिरणीत आढळलेले अंदाजे १० ट्रक लाकूड मोजणीसाठी तिसरा दिवस उजाळला आहे. तरी देखील लाकूड मोजण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. अखेर बुधवारी लाकूड मोजणीसाठी वनविभागाने अतिरिक्त चमू नियुक्त केली आहे. या अवैध लाकडाबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.वनविभागाच्या माहितीनुसार नवदुर्गा आरागिरणीत आढळलेले लाकूड हे येथील जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील ४३ वृक्ष कटाईचे आहेत. सदर अरागिरणी मालकाने ४३ वृक्ष कापण्याची परवानगी देखील वनाधिकाऱ्यांना सादर केल्याचा दावा वनविभागाने केला आहे. मात्र जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय वारे यांनी डफरीन रुग्णालयातून वृक्ष तोडण्याला परवानगी देण्यात आली नाही, अशी माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे नवदुर्गा आरागिरणीत आढळलेले लाकूड नेमके कुठून आणल्या गेले हे स्पष्ट होऊ शकले नाही. एका आरागिरणीत ८ ते १० ट्रक अवैध लाकूड आणल्या जात असताना शहरातील अन्य आरागिरण्यांमध्ये किती अवैध लाकूड साठवून ठेवण्यात आले, यापासून वनविभाग अनभिज्ञ आहे. त्यामुळे आरागिरणी वनपालांनी आतापर्यत कोणते कर्तव्य बजावले हे देखील वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना तपासणे गरजेचे आहे. आरागिरणी परिसरात अवैध १० ट्रक लाकूड आणून साठविले जात असताना सदर वनपालांना ही माहिती का मिळू नये? हा विषय संशोधनाचा आहे. आरागिरणीचा मलईदार कारभार मिळावा, यासाठी ‘खटाटोप’ करणाऱ्या वनपालांनी दोन महिन्यांपासून आरागिरण्यांची तपासणी केली काय? हे वरिष्ठांनी स्टॉक रजिस्टर तपासल्यास बरेच सत्य समोर येईल. आरागिरणी मालक शहराबाहेरुन मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड आणत असल्याचे नवदुर्गा आरागिरणीत आढळलेल्या लाकडावरुन स्पष्ट होते.आदेश एक, वृक्षतोड अनेकआरागिरणी मालकांवर वनविभागाचे अंकुश नसल्यामुळे ग्रामीण भागातून शहरातील आरागिरण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोडीचे लाकूड आणले जात आहे. जुने वृक्षतोड आदेशाचा वापर करुन आरागिरणीत लाकूड आणण्याचा सिलसिला सुरु आहे. ट्रकवर ताडपत्री झाकून अवैध लाकूड आणले जात असताना वनविभाग कारवाई का करीत नाही? याची दखल वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.मार्च महिन्यात परवानगीचे लाकूड सप्टेंबरमध्ये आले कसे?नवदुर्गा आरागिरणीत १० ट्रक आढळलेल्या लाक डाला नियमानुसार परवानगी असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. डफरीन परिसरात नवीन बांधकामात अडसर ठरणारे ४७ वृक्षाचे मुल्यांकन ‘बी अँन्ड सी’ने काढले होते. नियमांची पुर्तता करुन मार्च २०१६ मध्ये ४३ वृक्ष कापण्याची परवानगी देण्यात आली. मात्र मार्च महिन्यात वृक्षतोड परवानगीचे लाकूड सहा महिन्यांनंतर सप्टेंबर महिन्यात आले कसे? हा चिंतनाचा विषय आहे. वृक्षतोड आदेश असलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. डफरीनमधील वृक्ष तोडण्यात आले त्याची गोलाई तपासली जाईल. आरागिरणी मालकाला अभय मिळणार नाही, अशी नियमानुसार कारवाई करु.- हरिश्चंद्र पडगव्हाणकरवनक्षेत्राधिकारी, वडाळी