शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशीही कचरा धगधगतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 21:52 IST

भातकुली रोडवरील सुकळी वनारसी येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीचा बुधवारी सलग तिसरा दिवस होता. हा आगडोंब अद्याप थांबलेला नाही. या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असलेल्या अग्निशमन दलाची मात्र पुरती दमछाक झाली आहे.

ठळक मुद्देसुकळी कम्पोस्ट डेपो : अग्निशमनची दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भातकुली रोडवरील सुकळी वनारसी येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीचा बुधवारी सलग तिसरा दिवस होता. हा आगडोंब अद्याप थांबलेला नाही. या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असलेल्या अग्निशमन दलाची मात्र पुरती दमछाक झाली आहे.सुकळी वनारसी कंपोस्ट डेपोत शहरातील संपूर्ण कचरा टाकला जातो. आता कचऱ्याचा ढीग शंभर ते दोनशे फुटांवर पोहोचला असून, त्याचा छोटेखानी डोंगरच तयार झाला आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात अद्याप स्थानिक प्रशासनाला यश मिळालेले नाही. या कचरा डेपोत सोमवारी आग लागली. आगीने हळूहळू भीषण रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट आसमंतात पसरल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन पथकाला कळविण्यात आले. अग्निशमन पथकाने सोमवारी प्रथम तीन बंबांनी पाण्याचा मारा करून आग नियंत्रण आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, आग नियंत्रणात आली नाही. मंगळवारीसुद्धा पाण्याचा मारा सुरूच ठेवला. बुधवारी आगीचा तिसरा दिवस उजाडला तरी अद्यापही आग आटोक्यात आलेली नाही. आतापर्यंत २१ बंब रिते झाले आहेत.आगीलाही प्लास्टिकची बाधाकचरा डेपोत सर्वाधिक प्लास्टिक फेकले जात असून, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिक अधिक आहे. प्लास्टिकमुळे आग नियंत्रणात आणण्यास बरेच परिश्रम घ्यावे लागत आहे. कचऱ्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या प्लास्टिक पन्नीमुळे पाणी खोलवर धुमसत असलेल्या आगीपर्यंत पोहोतच नसल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात अग्निशमन दलाने महापालिका उपायुक्त वानखडे यांच्याशी संपर्क केला. आता जेसीबीने कचरा उलथवून आगीवर पाण्याचा मारा केला जाणार आहे, जेणेकरून कचºयाच्या तळापर्यंत पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात येईल.