शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
5
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
6
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
7
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
8
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
9
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
10
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
11
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
12
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
13
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
14
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
15
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
16
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
17
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
18
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
19
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
20
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?

चोरांनी चार व्यापारी प्रतिष्ठाने फोडली; राठीनगरात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:15 IST

अज्ञात चोरट्यांनी जुन्या कॉटन मार्केट परिसरातील खत्री कॉम्प्लेक्समधील तीन व मोचीगल्लीत एक व्यापारी प्रतिष्ठान फोडून तब्बल १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. आणखी एका व्यापारी प्रतिष्ठानातही चोरीचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सकाळी निदर्शनास आली. दोन अल्पवयीनांनी ही व्यापारी प्रतिष्ठाने फोडल्याचा संशय पोलिसांना बळावला आहे.

ठळक मुद्दे१ लाख १२ हजारांचा मुद्देमाल लंपास : कॉटन मार्केट परिसरातील खत्री कॉम्प्लेक्समधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अज्ञात चोरट्यांनी जुन्या कॉटन मार्केट परिसरातील खत्री कॉम्प्लेक्समधील तीन व मोचीगल्लीत एक व्यापारी प्रतिष्ठान फोडून तब्बल १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. आणखी एका व्यापारी प्रतिष्ठानातही चोरीचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सकाळी निदर्शनास आली. दोन अल्पवयीनांनी ही व्यापारी प्रतिष्ठाने फोडल्याचा संशय पोलिसांना बळावला आहे.खत्री कॉम्प्लेक्स येथे तेजपाल साधवानी (५०, रा. अनुपनगर, रहाटगाव) यांचे इलेक्ट्रीकल, राहुल मोहनलाल चावला (२८, रा. शकंरनगर) यांचे टेलरिंग साहित्य, व कमलेश जयसिंघानिया (३२, रा. कृष्णानगर, रामपुरी कॅम्प) यांचे प्लम्बिंग साहित्य विक्रीचे प्रतिष्ठान आहे. सोमवारी सकाळी प्रतिष्ठाने उघडण्यासाठी आले त्यावेळी त्यांना शटर खालच्या बाजूने वर वाकलेले दिसले. प्रतिष्ठानातून चोरांनी साहित्य लंपास केल्याचेही निदर्शनास आले. मोची गल्लीतील ताहा अलसीसर जामनगरवाला (३३, रा.बोहरा गल्ली) यांच्या दुकानातून १० हजारांची रोकड व ९ हजारांचा सीसीटीव्ही लंपास करण्यात आला. व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून उपनिरीक्षक श्रीकांत नारमोडे यांच्या पथकाने पंचनामा केला. चोरांनी साधवानी यांच्या प्रतिष्ठानातून ७५ हजार व चावला यांच्या प्रतिष्ठानातून ३५०० रुपयांचे साहित्य, तर जयसिंघांनियांच्या प्रतिष्ठानातून ४४०० रुपये रोख लंपास केले. कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.ऐवज लंपासअमरावती : राठीनगरातील एका घराचे कुलूप तोडून चोरांनी तब्बल ४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली. गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.राठीनगरातील रहिवासी भैरवी अमर ढवळे ही महिला ३० जून रोजी कुटुंबीयांसह गोविंदनगरात मावशीच्या घरी गेल्या होत्या. रविवारी रात्री घरी परतल्या असता, त्यांना दाराचे कुलुप तुटलेले दिसले. घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त स्थितीत आढळून आले. चोरांनी कपाटाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा एकूण ४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याचे निदर्शनास आले. घटनेच्या माहितीवरून पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विनोद चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाने पाचारण करून तपासकार्य सुरू केले. या घटनेत पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला आहे.दोन अल्पवयीनांवर संशयघरफोड्या, दुचाकी चोरीमध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले होते. त्यांनी दुचाकीचोरींची कबुली दिली आहे. व्यापारी प्रतिष्ठानांतील चोरीच्या गुन्ह्यातही या अल्पवयीनांचा सहभाग असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. त्यामुळे गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या अल्पवयीनांची चौकशी आता पोलिसांकडून करण्यात येणार आहे.सुरक्षेचा अभावखत्री कॉम्प्लेक्समध्ये पन्नासेक व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. तथापि, या व्यापारी संकुलात सुरक्षा रक्षक नाही. काही व्यापाऱ्यांकडे सीसीटीव्ही आहेत; मात्र, ते बंद अवस्थेत आहेत. त्यातच रात्रीच्या वेळेत प्रवेशद्वाराचे शटर बंद केले जात असल्यामुळे तेथे पोलिसांची गस्त लावता येत नाही. कोतवाली पोलीस व्यापाºयांना पत्र देऊन सुरक्षा रक्षक ठेवण्याची विनंती व गस्त लावण्यासाठी प्रवेशद्वार उघडे ठेवण्यास सांगणार आहे.