शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

वाघनखं विकणाऱ्याला अमरावतीत अटक; मोबाईल टॉवरवरून मिळविले लोकेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 15:42 IST

वाघनखं विक्रीतील चिखलदरा येथील विक्रांत सुरपाटणे नामक आरोपीला शुक्रवार, १८ जानेवारीला सायंकाळी अमरावतीमधून वनअधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

अनिल कडूलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पूर्व मेळघाट वनविभागाच्या वनाधिकाऱ्यांनी वाघनखं विकणाऱ्याला अमरावतीतून ताब्यात घेतले. वाघमिशीच्या शोधात आलेल्या वनअधिकाऱ्यांना ती वाघमिशी धारणीत असल्याची माहिती मिळाली आहे.व्याघ्र प्रकल्पांतर्गत बंदरकहू परिसरातील मृत वाघाची नखे आरोपींकडून वनाधिकाऱ्यांनी यापूर्वीच हस्तगत केली आहेत. यात सात आरोपींना अटक करून त्यांच्या वनकोठडीनंतर त्यांची जेलमध्ये रवानगी केली आहे. दरम्यान, वाघनखं विक्रीतील चिखलदरा येथील विक्रांत सुरपाटणे नामक आरोपीला शुक्रवार, १८ जानेवारीला सायंकाळी अमरावतीमधून वनअधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्याला अमरावतीवरून परतवाड्याला आणण्यात आले आहे.विक्रांतला ताब्यात घेण्याकरिता यापूर्वी चिखलदरा येथे वनाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे ते अमरावतीला त्याच्या शोधार्थ पोहचलेत. पण, तेव्हा त्याचे लोकेशन वर्धा मिळत होते म्हणून त्यांना खाली हात परतावे लागले. परंतु, तिसऱ्या प्रयत्नात टायरवरील लोकेशननुसार त्याला अटक करण्यात वनाधिकारी यशस्वी ठरले. विक्रांतकडून अनेक बाबींचा उलगडा होण्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. दरम्यान वनाधिकाऱ्यांनी वाघमिशीच्या शोधार्थ धारणी आणि आकोट-अकोला मार्गावरील चोहट्टाबाजार येथेही शोधमोहीम राबविली. यात ती वाघमिशी धारणीत असल्याचे संकेत मिळाले. संबंधित आरोपी धारणीतून पसार झाल्यामुळे आरोपी व वाघमिशी वनाधिकाऱ्यांच्या हाती लागलेली नाही.वाघनखं विकणाऱ्या विक्रांतची वनाधिकाऱ्यांनी अचलपूर न्यायालयातून वनकोठडी मिळविली असून, त्यावर कडक पहारा ठेवण्याकरिता एक वनपाल व वनरक्षकास तैनात केले आहे. यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाघमिशीशी संबंधित आरोपीला अटक करण्याकरिता ते प्रयत्नरत आहेत. पूर्व मेळघाट वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अशोक पºहाड हे प्रकरणाची चौकशी करीत आहेत. वनपाल विजय बारब्दे, सुधीर हाते त्यांना सहकार्य करीत आहेत.

 

टॅग्स :Tigerवाघ