पदाधिकारी एकवटले : आयुक्तांना घेरण्याची रणनीतीअमरावती : नवीन व अतिरिक्त बांधकामावरील कर आकारणीबाबत विशेष सर्वसाधारण सभा घेणार नाही. यापूर्वी झालेल्या सभेच्या ठरावानुसार दुप्पट कर आकारणी मान्य असेल, असा निर्णय पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सर्वानुमते घेतला. त्यामुळे कर आकारणीबाबत विशेष सभा बोलविण्याच्या आयुक्तांच्या प्रस्तावाला सदस्यांनी एकप्रकारे नकारच दिला आहे. महापौर चरणजितकौर नंदा यांच्या अध्यक्षस्थानी पार पडलेल्या बैठकीत पक्षनेता बबलू शेखावत, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, राष्ट्रवादी फ्रंटचे गटेनता अविनाश मार्डीकर, रिपाइंचे गटनेता प्रकाश बनसोड, बसपाच्या गटनेत्या गुंफाबाई मेश्राम, माजी विराधी पक्षनेता दिगंबर डहाके, चेतन पवार, अजय गोंडाणे आदी उपस्थित होते. २० जुलैच्या आमसभेत पारित ठराव क्र.१२६,१२८,१२९ नुसार कर आकारणीबाबत सुस्पष्टता नसल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. कर आकारणीबाबत विशेष सर्वसाधारण सभा होणार नाही. मागील सभेचा कार्यवृत्तांत मंजूर करताना काही दुरुस्त्या असल्यास त्या मंजूर केल्या जातील. निवासी क्षेत्रात दुप्पट कर आकारणीचा ठराव मान्य असून तो नागरिकांच्या हिताचा आहे. - चरणजितकौर नंदा,महापौर, महापालिका.निवासी क्षेत्राकरिता दुप्पट कर आकारणी मान्य राहील. वाणिज्य व मोठ्या बांधकामांसाठी कर आकारणी लागू करताना काही निर्णय घेतले जातील. परंतु निवासी क्षेत्रासाठी सहापट कर आकारणी होऊ देणार नाही. त्याकरिता विशेष सभा होणार नाही.- बबलू शेखावत,पक्षनेता, काँग्रेस.सभा बोलविण्याचा अधिकार महापौरांना आहे. यापूर्वीच्या सर्वसाधारण सभेत कर आकारणीबाबत मंजूर झालेला ठराव प्रशासनाने शासनाकडे पाठवावा. पुन्हा सभा घेण्याचा प्रश्नच नाही. सभागृहाचे कामकाज लोकहितासाठी चालते आयुक्तांसाठी नाही. - प्रवीण हरमकर,विरोधी पक्षनेता, महापालिका.
कर आकारणीवर विशेष सभा नाही
By admin | Updated: July 25, 2015 00:06 IST