शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
5
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
6
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
7
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
8
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
9
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
10
दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार
11
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
12
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
13
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
14
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
15
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
16
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
17
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
18
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
19
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
20
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?

आता माघार नाही

By admin | Updated: May 14, 2015 00:16 IST

कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात बँक व्यवस्थापनाला स्वारस्य नाही. कर्मचाऱ्यांबाबत व्यवस्थापनाची भावनाच....

कर्मचाऱ्यांचा निर्र्धार : शतकोटींची उलाढाल ठप्प अमरावती : कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात बँक व्यवस्थापनाला स्वारस्य नाही. कर्मचाऱ्यांबाबत व्यवस्थापनाची भावनाच संवेदनशून्य आहे. महागाई भत्त्यात कित्येक वर्षांत वाढ नाही, वाढत्या महागाईचा सामना कसा करावा, असा सवाल एका महिला कर्मचाऱ्याने व्यक्त केला. एकीकडे बँक नफ्यात असताना कर्मचाऱ्यांना भत्ता द्यायला पैसे नाहीत. दुसरीकडे बँक व्यवस्थापनाची उधळपट्टी सुरु आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे मागण्या पूर्ण होईपर्यंत संप कायम राहिल, असे कर्मचारी संघटनेने स्पष्ट केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी संघटनेच्या संपाला तीन दिवस झाले असताना व्यवस्थापनाद्वारा कुठलीही तडजोड नाही. संघटना व व्यवस्थापन आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने संघर्ष अटळ आहे. या तीन दिवसांत जिल्हा बँकेची १०० कोटींची उलढाल ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील ८८ शाखांचे कामकाज बंद असल्याने शेतकरी व ग्राहक मात्र नाहक वेठीस धरले जात आहेत. कर्मचाऱ्यांना महागाईभत्ता पूूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावा, अनुकंपा तत्त्वावरील भरती त्वरित सुरु करावी, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घ्यावे, रोखलेल्या वेतनवाढी व पगार देण्यात यावेत, कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेळेत काम देऊ नय, सेवा नियमांमध्ये केलेला एकतर्फी बदल रद्द करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेद्वारा ११ मेपासून बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. संपात ८८ शाखांचे ६०० कर्मचारी सहभागी झाल्याने सर्व शाखांचे कामकाज ठप्प आहे. व्यवस्थापनाने ेअद्याप चर्चेची तयारी दाखविली नाही. संपाला भारतीय मजदूर संघ, राज्य सहकारी बँक कर्मचारी महासंघ, खामगाव कोआॅपरेटिव्ह बँक कर्मचारी संघाने पाठिंबा घोषित केला आहे.कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. बँकेचे धोरण कर्मचारीविरोधी व एककल्ली आहे. बंदातून माघार घ्यावी, यासाठी कर्मचाऱ्यांवर दडपण आणले जात आहे. परंतु मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार. - प्रभाकर किलोर, सचिव, कर्मचारी संघटना