शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आरागिरण्यांचे ‘फायर आॅडिट’ नाही, धोकादायक स्थिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 18:20 IST

राज्य शासनाच्या उद्योग व कामगार विभागाने आरागिरणी उद्योग हे ‘डेंजर इंडस्ट्रीज’ जाहीर केले असताना आरागिरण्यांचे परवाना नूतनीकरण करतेवेळी ‘फायर आॅडिट’ तपासले जात नाही

गणेश वासनिकअमरावती : राज्य शासनाच्या उद्योग व कामगार विभागाने आरागिरणी उद्योग हे ‘डेंजर इंडस्ट्रीज’ जाहीर केले असताना आरागिरण्यांचे परवाना नूतनीकरण करतेवेळी ‘फायर आॅडिट’ तपासले जात नाही. परिणामी चार हजार आरागिरण्या धोकादायक स्थितीत सुरू असल्याचे वास्तव पुढे आले आहे.उद्योग व कामगार विभागाने ७ जुलै १९८१ रोजी आरागिरणी उद्योग धोकादायक उद्योग जाहीर केलेला आहे. त्यामुळे आरागिरणी परवान्यांचे नूतनीकरण करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘किमान प्रदूषण प्रमाणपत्र’ तसेच महापालिका, नगरपालिका हद्दीतील आरागिरण्यांचे ‘फायर आॅडिट’ करणे नियमावली आहे. मात्र, १२ वर्षांपासून आरागिरण्यांचे ‘फायर आॅडिट’ झाले नसताना संबंधित वनाधिकाºयांनी दरवर्षी परवान्यांचे नूतनीकरण सर्रास करीत आहे. लाकूड हे पेट्रोलपेक्षा अतिशय ज्वलनशिल असून तो गतीने पेट घेतो. या गंभीर बाबीची दखल मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, महापालिका आयुक्त किंवा मुख्याधिकाºयांनी घेऊ नये, हे आश्चर्य मानले जात आहे. नागरी वस्त्यांशेजारी असलेल्या आरागिरणीतून निघणारा धूर, प्रदूषण आणि प्रसंगी आग लागल्याने वाढत्या तापमानाने प्राणीमात्राचे प्रचंड नुकसान होते. या महत्त्वाच्या बाबीसाठी आरागिरण्यांचे ‘फायर आॅडिट’ अनिवार्य करण्यात आले आहे. आरागिरणींना उद्योेगाचा दर्जा मिळाल्याने त्यांच्या ‘फायर आॅडिट’साठी वरिष्ठ वनाधिकारी, महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी हे कधीही पुढे सरसावले नाहीत. गेल्या १२ वर्षांपासून ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा आरागिरणी नूतनीकरणाचा कारभार सुरू आहे. ‘फायर आॅडिट’ची संकल्पना २००५ मध्ये राष्ट्रीय इमारत संहितेनुसार सुरू झाली. मात्र, या संहितेचे पालन करण्यात राज्य शासन माघारले आहे.

शासकीय इमारती ‘फायर आॅडिट’पासून वंचितराज्यात २६ महापालिका, २५६ नगरपालिका हद्दीतील सर्व शासकीय इमारतींचे फायर आॅडिट  सन २००६ पासून आजतागायत नियमांच्या तरतुदीनुसार करण्यात आले नाही. महापालिका अ‍ॅक्ट कलम २५६ (१) नुसार ‘स्टॅबिलिटी सर्टिफिकेट’ हे १०० वर्षांपूर्वीच्या इमारतीसाठी कुणीही घेतलेले नाही. ही बाब अत्यंत गंभीर व त्या इमारतीत राहणारे आणि वावरणारे व्यक्तिंच्या जीविताची हानी करणारी आहे. 

हे असावेत आग प्रतिबंधक साहित्यआरागिरणी हा उद्योग ‘डेंजर इंडस्ट्रीज’मध्ये गणला गेला आहे. त्यामुळे महापालिका किंवा नगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाºयांकडून आरागिरणींचे ‘फायर आॅडिट’ करणे नियमावली आहे. यात मुबलक पाणी व्यवस्था, अग्निशमन यंत्रे, जलवाहिनी, वॉटर सोर्स, वाळूने भरलेल्या बकेट आदी साहित्य ठेवावे लागते. मात्र, राज्यात चार हजार आरागिरणींचे ‘फायर आॅडिट’ करून परवान्याचे नूतनीकरण झाले नाही.

‘फायर आॅडिट’ व्हावे, हे शासन निर्णय आहे. मात्र, ज्यांचे नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज प्राप्त झालेत त्यांचे ‘फायर आॅडिट’ केले जाते. परंतु आजतागायत आरागिरणी मालकांनी ‘फायर आॅडिट’ केलेले नाहीत.- भरतसिंह चव्हाण,अग्निशामक अधिकारी, अमरावती महापालिका