शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांसाठी लाखोंचे रस्ते, रुग्णांसाठी सिटी स्कॅन नाही

By admin | Updated: January 20, 2016 00:32 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनानिमित्त रात्रीतून ५० लाख रुपयांचा रस्ता निर्माण केला जातो.

वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा : परिचारिका पदभरतीची बोंबाबोंब, रुग्णसेवा ढासळलीअमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनानिमित्त रात्रीतून ५० लाख रुपयांचा रस्ता निर्माण केला जातो. मात्र,मागिल पाच वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्वीन) येथे सिटी स्कॅन, डिजिटल एक्स-रे मशीन शासनाने उपलब्ध करुन दिलेले नाही. त्यामुळे शासन गरीब, सामान्यांबद्दल किती सजग आहे, हे दिसून येते.येथील इर्विन रुग्णालयास राज्य शासनाने ‘ट्रामा केअर’ चा दर्जा देऊन अत्यावश्यक रुग्णसेवेची जबाबदारी दिली आहे. मात्र, इर्विनची रुग्णसेवा कोमात गेली असताना याकङे लोकप्रतिनिधींचे देखील दुर्लक्ष आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटी स्कॅन मशिनचे आयुष्य संपल्याने ती कधीचीच बंद पडली आहे तर एक्स-रे मशिनचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे अपघात अथवा एखाद्या गंभीर आजाराच्या रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय यंत्रणेची पाच वर्षांपासून कसरत होत आहे. इर्विनच्या शल्य चिकित्सकांनी सिटी स्कॅन, डिजिटल एक्स-रे मशिनची गरज अनेकदा वरिष्ठांच्या माध्यमातून शासनाकडे पाठविली आहे. मात्र, राज्याच्या आरोग्य विभागाचे कामकाज ‘आंधळं दळते, कुत्रं पिठ खाते’ असा सुरु आहे. इर्र्विनची रुग्णसेवा ढासळत चालली असताना या गंभीर समस्येविषयी एकाही आमदारांनी विधिमंडळात आवाज उचलू नये, ही बाब लाजिरवाणी मानली जात आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नववर्षाच्या प्रारंभीच असलेल्या दौऱ्यासाठी प्रशासनाने सातुर्णा परिसरातील ५० लाख रुपयातून रस्त्याचे डांबरीकरण रात्रीतून करण्याची किमया केली. इतकेच नव्हे तर सर्वच लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आपसात स्पर्धा करताना दिसून आले. जिल्ह्यातील रुग्णसेवेचा भार इर्विन रुग्णालयावर असून वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. ट्रामा केअर सेंटर म्हटले की रुग्णाला तत्काळ अत्यावश्यक सेवा मिळायला हवी. परंतु इर्विन रुग्णालयात सिटी स्कॅन डिजिटल एक्स-रे मशिन नसल्यामुळे एका अपघाताच्या घटनेनंतर उपचारास दाखल झालेल्या रुग्णांवर वेळीच योग्य ते उपचार करता आलेनाही. एकूण मागिल पाच वर्षांत शेकडो रुग्णांना प्राण गमवावे लागल्याचे वास्तव आहे. काही दिवसांपूर्वी इर्विन रुग्णालयाची रंगरंगोटी करुन या ब्रिटिशकालिन वास्तूला नवा लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रुग्णसेवेसाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी वर्ग, परिचारिकांची वानवा असल्यामुळे रुग्णसेवेचा डोलारा कसा सांभाळावा, या चिंतेत जिल्हा शल्य चिकित्सक आहेत. रुग्णसेवेला प्राधान्य देणे क्रमप्राप्त असताना इर्विन रुग्णालयातील मुलभूत समस्या सोडविण्याऐवजी प्रशासन मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री अन्य मंत्र्यांच्या दौऱ्याला महत्त्व देत असल्याचे दिसून येते. स्थानिक सातुर्णा परिसरात मुख्यमंत्री फडणवीस येणार असल्यामुळे १ जानेवारीला रात्रीतून रस्ता निर्माण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला मात्र सिटी स्कॅन मशिनसाठी केवळ दोन कोटी रुपये मंजूर करण्यासाठी आमदार, खासदारांना पाठपुरावा करण्याचे कर्तव्य बजावता येत नाही, हे वास्तव आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथे अद्ययावत सोयी, सुविधा, यंत्रसामुग्री पुरविण्याची गरज आहे.