शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

तत्कालीन कुलगुरूंनी ‘आयकर’ माहिती दडविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 21:50 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांनी आयकर विवरणपत्रात बंगल्यावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची माहिती दडविली. खेडकरांनी फॉर्म क्रमांक १६ व १२ बी.ए.मध्ये या बाबी नमूद केल्या नाहीत, ही सत्यता माहिती अधिकारातून समोर आली आहे. यासंदर्भात आयकर विभागाने विद्यापीठाला पत्र पाठवून माहिती मागविली, हे विशेष.

ठळक मुद्देफॉर्म १६ व १२ बी.ए.मध्ये नमूद नाही : बंगल्यावरील कर्मचाऱ्यांच्या वेतन नोंदीचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांनी आयकर विवरणपत्रात बंगल्यावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची माहिती दडविली. खेडकरांनी फॉर्म क्रमांक १६ व १२ बी.ए.मध्ये या बाबी नमूद केल्या नाहीत, ही सत्यता माहिती अधिकारातून समोर आली आहे. यासंदर्भात आयकर विभागाने विद्यापीठाला पत्र पाठवून माहिती मागविली, हे विशेष.मोहन खेडकर हे विद्यापीठात २३ फेब्रुवारी २०११ ते २४ फेब्रुवारी २०१६ दरम्यान कुलगुरू होते. आयकर विभागाने सुसज्ज कुलगुरू बंगल्यावर खेडकरांनी घेतलेल्या वीज, पाणी, फर्निचर, नोकर-चाकर आदी सुविधांवर खर्चाची माहिती मागविली आहे. वीज, फर्निचर, बागवान,, बंगल्यावर कामगार, घरकामगार, सुरक्षा रक्षक, कायमस्वरूपी कर्मचारी आणि वॉचमन यांच्यासाठी पाच वर्षांत १ कोटी ३९ लाख रुपये खर्च झाल्याची आकडेवारी आहे. या खर्चाच्या अनुषंगाने खेडकरांच्या मासिक वेतनात ही रक्कम नमूद होणे नियमावली होती.सुविधांवरील खर्च नमूद नाहीखेडकरांनी पाच वर्षात सुसज्ज कुलगुरू बंगल्यावर सर्वच सुविधा घेतल्या आहेत.तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांनी ही माहिती आयकर विभागाला कळविली नाही. आयकर विभागाकडे फॉर्म १६ व १२ बी.ए.मध्ये कर्मचारी वेतन, बंगल्यावर फर्निचरसह अन्य सुविधांवर झालेला खर्च नमूद केला नाही. खेडकरांनी आयकर विवरणपत्रात बंगल्यावरील कर्मचाºयांचे वेतन, सुविधांवरील खर्च सादर केलेला नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने माहिती अधिकारातून स्पष्ट केले आहे. खेडकर यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कर्मचारी वेतन, माळी, सफाई कर्मचारी, पाणी, विद्युत, फर्निचर सुविधा, कंत्राटी कर्मचारी आदींचा खर्च १ कोटी ३९ लाख रुपये झाला आहे. यात नियमित कर्मचारी वेतन ७८ लाख ३७ हजार, दैंनदिन कामगार २ लाख ४४ हजार, माळी आणि कंत्राटी कर्मचारी २२ लाख २७ हजार, वीज देयके पाच लाख, फर्निचर साहित्य खरेदी पाच लाख रुपये झाल्याची माहिती आहे.आयकर विभागाने मागविलेली माहिती गोळा केली जात आहे. वित्त व लेखा विभागाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, यात जे काही वास्तव असेल, ते आयकर विभाग शोधून काढेल.- मुरलीधर चांदेकरकुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.