शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तत्कालीन तहसीलदारावर होणार फौजदारी कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:16 IST

तालुक्यातील ७५ टक्के जमीन ओलिताखाली असताना सर्वच शेतकऱ्यांची जमीन जिरायती दाखवून चुकीची माहिती प्रशासनाला पाठविल्याने अनेक शेतकरी योग्य लाभापासून वंचित राहिले. याला तत्कालीन तहसीलदार कारणीभूत समजून फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबोंडअळीच्या अनुदानात घोळ : सिंचनापासून शेतकऱ्यांना ठेवले वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : तालुक्यातील ७५ टक्के जमीन ओलिताखाली असताना सर्वच शेतकऱ्यांची जमीन जिरायती दाखवून चुकीची माहिती प्रशासनाला पाठविल्याने अनेक शेतकरी योग्य लाभापासून वंचित राहिले. याला तत्कालीन तहसीलदार कारणीभूत समजून फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल मागितला.राज्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांना राज्य सरकारने आर्थिक मदत घोषित केली होती. यात तालुक्यातील २६ हजार ९०७ शेतकरी पात्र ठरले होते. शासनाने कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार ८००, तर ओलिताखालील जमिनीला १३ हजार ५०० रुपये हेक्टरी अनुदान घोषित केले. तत्कालीन तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी सर्वच शेतकºयांची जमीन जिरायती दाखविल्याने ओलिताखालील भागधारकांचे मोठे नुकसान झाले. यासंदर्भात आमदार वीरेंद्र जगताप यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून तत्कालीन तहसीलदारावर कारवाई करावी व ओलिताखालील भूधारकांना त्वरित अनुदान देण्याची मागणी केली होती.धामणगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात हे प्रकरण मांडले होते. तालुक्यात ७० टक्के जमीन ओलिताखाली असताना प्रशासनाने चुकीची माहिती देऊन शेतकºयांना शासनाच्या अनुदानापासून वंचित ठेवल्याची वस्तुस्थिती प्रताप अडसड यांनी मांडली होती. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट चौकशीचे आदेश दिले होते.विभागीय आयुक्तांनी मागितला अहवालभारतीय किसान संघाचे तालुकाध्यक्ष शंकर कुर्वे व पदाधिकाऱ्यांनी गत आठवड्यात विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांवरील अन्यायाची कैफियत मांडली. सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तत्कालीन तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांची चौकशी करून त्वरित अहवाल पाठविण्याचे पत्राद्वारे कळविले. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानंतर तत्कालीन तहसीलदारांवर फौजदारी कारवाईचे संकेत महसूल विभागाने दिले आहे.शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या तत्कालीन तहसीलदारावर महसूल प्रशासनाने फौजदारी कारवाई करावी, अन्यथा न्यायालयीन लढाईचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागणार आहे.- सुभाष देशमुख संघटनमंत्री, भारतीय किसान संघ