शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांचे’ घराचे स्वप्न अपूर्णच !

By admin | Updated: April 20, 2017 00:02 IST

सैन्य दलात सेवा देत असतानाच स्वत:च्या कुटुंबासाठी आपल्या राहत्या गावी घराचे बांधकाम करणाऱ्या सुभेदार महेंद्र खांडेकर यांच्या आकस्मिक मृत्युमुळे ....

चटका लावणारी ‘एक्झिट’ : सैनिकाचा आकस्मिक मृत्यू, दर्यापुरात शोककळादर्यापूर : सैन्य दलात सेवा देत असतानाच स्वत:च्या कुटुंबासाठी आपल्या राहत्या गावी घराचे बांधकाम करणाऱ्या सुभेदार महेंद्र खांडेकर यांच्या आकस्मिक मृत्युमुळे त्यांच्या कुटुंंबावर शोककळा पसरली आहे. मे महिन्यात घराच्या बांधकामाचे अवलोकन करण्याकरिता ते दर्यापूरला येणार होते. तसे त्यांनी पत्नीला आदल्या दिवशीच दूरध्वनीवरून कळविले होते. मात्र, नव्या घरकुलाचे बांधकाम आणि डोळ्यांतील स्वप्ने अर्धवट सोडून ईहलोकाची यात्रा संपविणाऱ्या महेंद्र यांची ‘एक्झिट’ जीवाला चटका लावणारी ठरली आहे.येथील मूळ रहिवासी महेंद्र ओंकारराम खांडेकर हे रांची येथे सैन्यदलात सुभेदार म्हणून कार्यरत होते. सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना दर्यापुरातच स्थायिक व्हायचे असल्याने त्यांनी येथे घराचे बांधकाम काढले होते. पत्नी संगिता, अकरा वर्षांचा वैभव व नऊ वर्षांच्या वैष्णवीसह नव्या घरात सुखासमाधानाचे आयुष्य जगण्याची स्वप्ने ते पाहात होते. त्यांची दोन्ही मुले येथील प्रबोधन विद्यालयात शिकत आहेत. घराच्या बांधकामासाठी दोन महिन्यांपूर्वी ते येथे आले होते. बांधकाम मार्गी लाऊन ते पुन्हा नोकरीवर रुजू झाले. मे महिन्यात बांधकामाचा आढावा घेण्याकरिता ते दर्यापूरला येणार होते. मृत्युच्या आदल्या रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी फोन करून पत्नीकडे सर्वच गोष्टींची विचारपूस केली होती. मे महिन्यात महेंद्र गावी येणार असल्याने पत्नीला आनंद झाला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या कुटुंबावर कुठाराघात झाला. पत्नीच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नाहीत. मुलांना काय झाले तेच कळत नाही. संपूर्ण गाव महेंद्र खांडेकर यांच्या अकाली निधनाबद्दल हळहळत आहे. त्यांच्या घराकडे पाहून प्रत्येकाला नियतीच्या कठोरपणाची जाणीव होत आहे. (प्