या कॉम्प्लेक्समधील मझहरखान पठाण यांचे सीमा झेरॉक्स व जनरल स्टोअर्समधून चोरांनी १३ हजार रुपये रोख तसेच किरकोळ साहित्य चोरून नेले. त्याचबरोबर अक्षय राऊत यांच्या मालकीचे सह्याद्री प्लायवूड या दुकानातील ८ हजार ५०० रोख लंपास करण्यात आली. तसेच दुसऱ्या मजल्यावरील इन्शुरन्स काढून देणाऱ्या दुकानात प्रवेश करून किरकोळ रक्कम लंपास केली. या सर्व दुकानांचे शटर वाकवून चोरांनी आत प्रवेश केला. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही चोरी रात्री १२.३० ते १ च्यादरम्यान झाल्याचे दिसत असून तीन युवक तोंडाला रुमाल बांधून असल्याचे दिसून येते. हे कॉम्प्लेक्स अमरावती-वरूड मुख्य रस्त्यावर असून रात्रीलासुद्धा वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू राहते. पोलीस ठाणेदेखील जवळच आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोर्शीतील तीन दुकानांत चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:08 IST