शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

चोरीतील आरोपींना १२ तासात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:10 IST

फोटो पी २७ वरूड वरुड : स्थानिक गुन्हे शाखा व बेलाेडा शहीद पोलिसांनी अवघ्या १२ तासामध्ये बेलोडा येथील ...

फोटो पी २७ वरूड

वरुड : स्थानिक गुन्हे शाखा व बेलाेडा शहीद पोलिसांनी अवघ्या १२ तासामध्ये बेलोडा येथील एका धनगर बेड्यावर चोरट्यांनी चोरी करून नेलेली १ लाख ९२ हजार ५०० रुपयाच्या रकमेसह ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक केली.

२४ मे रोजी दाखल झालेल्या बेलोडा येथील धनगर बेडा येथील एका कुटुंबातील पैसे चोरी गेल्याबाबत बेलाेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला होता. या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे फिर्यादीच्या बेड्यावर राहणारा अंकुश शिवा हटकर याने त्याचा साथीदार सुमित भीमराव हटकर याचे सोबत संगनमत करून उपरोक्त गुन्ह्यात १ लाख ९२ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली असल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. वेगवेगळी विचारपूस केली असता आरोपींनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली, नंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच सदरचा गुन्हा संगनमताने केल्याची कबुली दिली.

आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेली रक्कम १ लाख ९२ हजार ५०० रुपये रोख व चोरीसाठी वापरलेली १ लाख रुपये किमतीची दुचाकी, दोन मोबाईल असा एकूण ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही आरोपींना बेनोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदर गुन्ह्याचा तपास अवघ्या १२ तासात करण्यात आला. या चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.