शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 05:00 IST

पालकमंत्री म्हणाल्या की, जिल्हा नियोजन समितीकडून ग्रामीण भागातील विविध कामांसाठी जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. तथापि, प्रशासनाकडून अनेक कामांना सुरुवात झाल्याचे दिसत नाही, असा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. निविदाप्रक्रिया झालेल्या कामांचे आदेश आजच काढा. उर्वरित निविदाप्रक्रिया पूर्ण करा, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामीण भागात विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून मोठ्या प्रमाणावर निधी देऊनही अजूनही अनेक कामांना सुरुवातच झालेली नाही. हे अत्यंत गंभीर असून, याबाबत कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामांचे कार्यारंभ आदेश आजच काढावे व उर्वरित कामांची निविदाप्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी. आपण स्वतः दोन दिवसांनी पुन्हा आढावा घेऊ, असे निर्देश महिला व बालविकासमंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी दिले.जिल्हा परिषदेतील जिल्हा नियोजन समितीविषयक कामकाजासंबंधी बैठक पालकमंत्री ना. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत  वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल  चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, पूजा आमले, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी सभापती जयंत देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते.पालकमंत्री म्हणाल्या की, जिल्हा नियोजन समितीकडून ग्रामीण भागातील विविध कामांसाठी जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. तथापि, प्रशासनाकडून अनेक कामांना सुरुवात झाल्याचे दिसत नाही, असा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. निविदाप्रक्रिया झालेल्या कामांचे आदेश आजच काढा. उर्वरित निविदाप्रक्रिया पूर्ण करा, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.अनेक कामांच्या दीड वर्षांपासून प्रशासकीय मान्यता मिळूनही कामे सुरू झालेली नाहीत. तीर्थक्षेत्र, जनसुविधा, १५वा वित्त आयोग, अंगणवाडी, वर्गखोली, दवाखाना बांधकाम आदी अनेक नियोजित कामांना चालना द्यावी. कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असावीत. जिल्हा परिषद प्रशासनाने कामांचा नियमित आढावा घ्यावा. प्रत्येक अंगणवाडीत बोलकी अंगणवाडी उपक्रम राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पुन्हा दोन दिवसांनी आढावा घेणारपालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशाचे पालन झाले की नाही, हे पाण्यासाठी पुन्हा दोन दिवसांनी आढावा घेण्यात येणार आहे. सर्व कामांच्या प्रगतीबाबत बुकलेट सादर करावे, असे निर्देश त्यांनी दिले. तीर्थक्षेत्र विकास योजनेत अनेक कामे प्रलंबित आहेत. 

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर