शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

तरूणीने दिली 'टिप' त्याने उडविली लाखांची रोख! २५० ग्रॅम सोने, २० लाख रुपये चोरीला

By प्रदीप भाकरे | Updated: October 11, 2022 18:46 IST

तरूणीच्या मित्राने तिच्या नातेवाईकाच्या घरातून तब्बल २५० ग्रॅम सोने व २० लाखांची रोकड लंपास केली. 

अमरावती : तरूणीने दिलेल्या माहितीच्या आधारे तिच्या मित्राने तिच्या नातेवाईकाच्या घरातून तब्बल २५० ग्रॅम सोने व २० लाखांची रोकड असा २८ लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी दोन तरूणांना अटक करण्यात आली आहे. एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून, त्या तरूणीला देखील अटक केली जाणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी दोघांना अटक केल्यानंतर हा घटनाक्रम समोर आला. भातकुली तहसील समोरील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमधून तब्बल २५० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले होते. शनिवारी सायंकाळी ही घटना उघड झाली होती. दरम्यान, प्लॉट विक्रीतून आलेली २० लाखांची रोखसुध्दा चोरीला गेल्याचे बयान तक्रारदार महिलेने दुसऱ्या दिवशी नोंदविले होते. त्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी ११ ऑक्टोबर रोजी सकाळी या चोरी प्रकरणात दोघांना अटक केली. शोएब खान मंजूर खान (२३, रा. ताजनगर) आणि शेख जुबेर शेख ताज (३१, रा. फियाननगर) असे अटक चोरांची नावे आहेत.

सीसीटिव्हीने सोडविला गुंतापोलिसांनुसार, ज्यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली, त्यांच्या शहरातीलच जवळची नातेवाईक असलेल्या १९ वर्षीय तरुणीने शेख जुबेरला नातेवाईकाच्या घरातील दागिने व रोखबाबत माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनेच्या दिवशी शोएब खान व शेख जुबेर हे एका पांढऱ्या रंगाच्या कारने अपार्टमेंटसमोर फेऱ्या मारताना दिसले. याचवेळी कारमध्ये एक तरुणी असल्याचेही दिसले. पोलिसांनी त्या दिशेने तपास चालविला.

दुसऱ्याच दिवशी विकली कारफ्रेजरपुरा पोलीस त्या कारचा शोध घेत असतानाच १० ऑक्टोबर रोजी रात्री यशोदानगर चौकात फूटेजमधील कारप्रमाणेच एक कार दिसली. पोलिसांनी पाठलाग करुन ती कार थांबवून कारमध्ये असलेल्या तरुणाची चौकशी केली. तर ती कार आपण कालच ७० हजार रुपयात शेख जुबेरकडून खरेदी केल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी पोलिसांनी त्या तरुणाच्या माध्यमातून शेख जुबेरला ईतवारा बाजारात बोलवले, त्याचवेळी त्याच्यासोबत शोएब खानसुध्दा होता. या दोघांनाही पोलिसांनी ठाण्यात आणले. त्यावेळी सुरूवातीला आमचा सहभाग नाही असे त्यांनी सांगितले मात्र पोलिसांसमोर दोघांनीही चोरीची कबुली दिली.

लव्ह ॲंगल तपासणारत्या तरूणीच्या माहितीवरून चोरी केल्याची कबुली दोघांनी दिल्याने फ्रेजरपुरा पोलिसांनी तिलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अद्याप अटक केलेली नाही. २० लाखांची रोख व चोरीचे दागिने जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. ही कारवाई फ्रेजरपुराचे ठाणेदार अनिल कुरळकर, क्राईम पोलीस निरिक्षक नितीन मगर, पोलीस निरिक्षक निशीकांत देशमुख, व त्यांच्या पथकाने केली आहे. ती तरूणी एकाची प्रेयसी की दोघांची मैत्रिण? या दिशेने देखील तपास केला जाणार आहे.