शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

घरातच थाटला कुंटणखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:06 IST

एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेमजाळात अडकवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

ठळक मुद्देदोघांना अटक : युगुलांना ५०० रुपयांत तासभर विसावा

आॅनलाईन लोकमतअमरावती : एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेमजाळात अडकवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हे लैंगिक संबंध जेथे प्रस्थापित झाले त्या भूमिपुत्र कॉलनीतील कुंटणखान्याचा सोमवारी पदार्फाश झाला. बलात्कार प्रकरणात कोतवाली पोलिसांनी कारवाई करीत दोघांना अटक केली. ऐहफाज अली हैदर अली (२१,रा. गौसनगर) व मनीष शामराव मार्टीन (२५,रा.भूमिपुत्र कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.सोमवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास एक २० वर्षीय तरुणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेली. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे कथन तिने पोलिसांसमोर केले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ व १०९ (गुन्हा करण्यास सहाय करणे) अन्वये गुन्हा नोंदविला. चौकशी सुरू करून मध्यरात्रीच आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीत कुंटणखान्याचा पदार्फाश झाला. आरोपी ऐहफाज अली हा आॅटोचालक असून तो दररोज पीडित मुलीला गोपालनगर ते श्याम चौकापर्यंत सोडून द्यायचा. ती तरुणी एका महाविद्यालयात शिकत आहे. दरम्यान आॅटोचालक ऐहफाजने पीडित मुलीचा मोबाईल क्रमांक मिळवूनन तिला प्रेमजाळात फसविले. दोघेही मोबाईलवर संभाषण करीत होते. दरम्यान एकदा ऐहफाजने तिला घरी नेले व तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगू नको, अशा धमक्या ऐहफाज दिल्यामुळे पीडितेने कुठेही याची वाच्यता केली नाही. ऐहफाजने पीडित मुलीला भूमिपुत्र कॉलनीतील रहिवासी मनीष मार्टीनच्या घरी नेले. तासभरासाठी खोली भाड्याने घेऊन ऐहफाजने पुन्हा तरुणीवर बलात्कार केला. अखेर ऐेहफाजच्या दररोजच्या त्रासाला कंटाळून पीडितेने सोमवारी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात पीआय दिलीप पाटील, पीएसआय सुजाता बन्सोड, डीबीचे स्कॉडचे अब्दुल कलाम, गजानन ढेवले, प्रफुल्ल खोब्रागडे, विनोद भगत यांनी दोघांना अटक केली. पोलिसांनी आरोपी ऐहफाजचा आॅटो क्रमांक एमएच २७-एफ-०४४० जप्त केला. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.५०० रुपये तास खोलीचे भाडेमनीष मार्टीन हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल आहे. भातकुलीत घडलेल्या एका बलात्कार प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याकडे तीन खोल्या असून तो प्रेमीयुगुलांना ५०० रुपये तासाप्रमाणे खोली भाड्याने देत असल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. मनीषने आणखी किती जणांना व कोणा-कोणाला खोली भाड्याने दिली होती. त्याने वेश्या व्यवसायासाठी खोलीचा वापर चालविल्याची शंकाही पोलिसांना आहे. त्यादिशेने पोलीस चौकशी करीत आहे.लव्ह-जिहाद ?बलात्कार प्रकरणातील एक आरोपी विशिष्ट समुदायातील असून त्याने पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लैंगिक अत्याचार केला. त्याने आणखी काही काही मुलींना फसविल्याची शंका पोलिसांना आहे. त्यामुळे हे प्रकरण लव्ह-जिहादचे असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलीस उपायुक्त शशीकांत सातव यांनी सांगितले.लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून दोघांना अटक केली. चौकशीनंतर एक आरोपी ५०० रुपये तासाप्रमाणे खोली भाड्याने देऊन अड्डाच चालवित असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. त्याने आणखी किती जणांची फसवणूक केली, ही बाब तपासली जाईल. त्या घराच्या दस्तऐवजांची शहानिशा करून तो अड्डा नष्ट करण्याचा प्रस्ताव तयार करू.- शशीकांत सातव,पोलीस उपायुक्त