शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कि डनी, मूत्रपिंड आजाराच्या ७८ शस्त्रक्रिया

By admin | Updated: July 25, 2016 00:06 IST

येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय गरिबांसाठी वरदान ठरले असून मूत्रपिंड विकार व किडनी आजाराने त्रस्त असलेल्या....

सुपर स्पेशालिटीच्या डॉक्टरांचे यश : २११ 'मेजर आॅपरेशन' अमरावती : येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय गरिबांसाठी वरदान ठरले असून मूत्रपिंड विकार व किडनी आजाराने त्रस्त असलेल्या ७८ रुग्णांच्या अतिकठीण, तर २११ मेजर आॅपरेशन येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वी केले आहे. येथे दाखल झालेल्या १८८ रुग्णांच्या किरकोळ शस्त्रक्रियाही पार पडल्या आहेत. एप्रिल ते जून या तीन महिन्यात ६ हजार ३८९ बाह्य रुग्णांनी येथे तपासण्या केल्या होत्या. २४२१ रुग्ण येथे उपचारासाठी दाखल झाले होते. यापैकी २१६७ रुग्णांना डायलिसीसवर ठेवण्यात आले होते. किडनीच्या आजारात वाढ झाली असून त्यामुळे मूत्रपिंड विकारामध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. किडनी स्टोन, मूत्र मार्गातील अडथळा, प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया तसेच किडनी निकामी झाल्यांतर डायलिसीस या आजारातही वाढ झाली आहे. वाढते मधुमेहाचे प्रमाण, उच्च रक्तदाब, वेदनाशामक औषधी मोठ्या प्रमाणात सेवन करणे तसेच किडनीमध्ये जंतू संसर्ग होणे आदी कारणामुळे किडनीचा विकार जडू शकतो. त्यामुळे योग्यवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास पुढील आजार हे काही प्रमाणात टाळता येऊ शकतात. सर्व शस्त्रक्रिया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली, किडनी सर्जन राहुल पोटाडे, विक्रम देशमुख, विशाल बाहेकर, अभिजित ढाले, ओ.जी. मुंदडा, आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी केल्या आहेत. त्यामुळे उपचार झालेल्या रुग्णांनी समाधान व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)४८ रुग्णांवर सुगठन शस्त्रक्रिया यावेळी ४८ रुग्णांचा अतिकठीन सुगठन शस्त्रक्रिया (प्लॅस्टिक सर्जरी) करण्यात आली आहे. तर ७ रुग्णांच्या मेजर तर १५९ जणांच्या किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. या आजाराच्या तपासणीसाठी ८०१ बाह्य रुग्ण तपासणी करण्यात आली असून १४६ रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथील सुपरस्पेशालिटीमध्ये ही शस्त्रक्रिया नि:शुल्क करण्यात येत असून यामुळे गरीब रुग्णांना दिलासा मिळत आहे.